घरदेश-विदेशव्हॉट्स अॅप ग्रुप अॅडमिनला करावी लागणार नोंदणी

व्हॉट्स अॅप ग्रुप अॅडमिनला करावी लागणार नोंदणी

Subscribe

किश्तवाड जिल्हा प्रशासनानं व्हॉट्स अॅप ग्रुप आणि फेसबुक चालवणाऱ्या लोकांना पोलिसांकडून तपासून घेण्यास आणि १० दिवसाच्या आत परवानगी मागण्यास सांगण्यात आलं आहे. जम्मू आणि काश्मीर परिसरात व्हॉट्स अॅप ग्रुप अॅडमिनला १० दिवसांच्या आत पोलीस स्टेशनमध्ये जाऊन नोंदणी करावी लागणार आहे. असं न केल्यास, तुरुंगात जावं लागेल असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.

सध्या सोशल मीडियावर सर्वात जास्त अफवा पसरताना दिसत आहेत. याचाच भाग म्हणून सोशल मीडियावर अफवांचा प्रसार थांबवण्यात येण्यासाठी जम्मू आणि काश्मीरमधील किश्तवाड जिल्हा प्रशासनानं व्हॉट्स अॅप ग्रुप आणि फेसबुक चालवणाऱ्या लोकांना पोलिसांकडून तपासून घेण्यास आणि १० दिवसाच्या आत परवानगी मागण्यास सांगण्यात आलं आहे. शिवाय या संदर्भात कठोर कारवाई करत अधिकाऱ्यांना शपथपत्र देऊन सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अपलोड करण्यात आलेल्या गोष्टींना व्यक्तिगत पातळीवर जबाबदार असतील असंही स्पष्ट केलं आहे. कायद्याचं उल्लंघन झाल्यास, अशा पोस्ट करणाऱ्या व्यक्तींना कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागेल असंही सांगण्यात आलं आहे.

पत्राला दिलेल्या उत्तरादाखल दिला आदेश

हा आदेश जिल्हा विकास आयुक्त (डीडीसी) इंग्रज सिंह राणा यांनी काढला असून अशा लोकांविरुद्ध आतंकवादी विरोधातील कायदा, बेकायदेशीर क्रिया कायदा, सूचना तंत्रज्ञान अधिनियम आणि सायबर गुन्हा या अंतर्गत खटला चालवण्यात येईल. अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणं डीडीसीनं किश्तवाडच्या पोलीस अधीक्षक अबरार चौधरी यांच्याकडून २२ जून रोजी पाठवण्यात आलेल्या पत्राच्या उत्तरादाखल हा आदेश देण्यात आला आहे. एसएसपीनं लिहिलेल्या पत्रात मोठ्या संख्येनं अफवा पसरवण्यासाठी, खोट्या सूचना देण्यासाठी वा प्रसार करण्यासाठी व्हॉट्स अॅप ग्रुप चालू असल्याचं सांगण्यात आलं आहे, तर यामुळं कायदा व्यवस्थेमध्ये समस्या निर्माण होऊ शकते अशी शंकादेखील व्यक्त करण्यात आली आहे. अशा घटना रोखण्यासाठीच हे पाऊल उचलण्यात यावं अशी सूचना पत्रातून देण्यात आली होती. या पत्राचं उत्तर म्हणूनच हा आदेश काढण्यात आला आहे. त्यामुळं जम्मू आणि काश्मीर परिसरात व्हॉट्स अॅप ग्रुप अॅडमिनला १० दिवसांच्या आत पोलीस स्टेशनमध्ये जाऊन नोंदणी करावी लागणार आहे. असं न केल्यास, तुरुंगात जावं लागेल असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -