घरदेश-विदेशजेएनयू हिंसाचारात डाव्या संघटनांचा हात

जेएनयू हिंसाचारात डाव्या संघटनांचा हात

Subscribe

आइशी घोषसह दहाजणांना नोटीस

जेएनयूमधील सर्व्हर रुमची तोडफोड केल्याप्रकरणी पोलिसांनी दहाजणांची ओळख पटवली आहे. त्यात जेएनयू विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा आइशी घोषसह जेएनयूचा माजी विद्यार्थी चुनचुन कुमार, सुचेता आणि प्रिया रंजन यांचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ओळख पटलेल्या सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांना नोटीस पाठवून स्पष्टीकरण मागण्यात येणार आहे.

दिल्ली पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. जेएनयूत नोंदणी करण्यास डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांचा विरोध होता. १ जानेवारी ते ५ जानेवारीच्या दरम्यान नोंदणी प्रक्रिया थांबवण्यापासून ते सर्व्हरची तोडफोड करण्यापर्यंत आणि पेरियार तसेच साबरमती हॉस्टेलमध्ये झालेल्या हिंसेचा तपशील यावेळी पोलिसांनी दिला. ३ जानेवारी रोजी स्टुडंट फ्रंट ऑफ इंडिया, ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन, ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशन आणि डेमोक्रॅटिक स्टुडंट्स फेडरेशनचे सदस्य मध्यवर्ती नोंदणी प्रक्रियेची यंत्रणा रोखण्यासाठी सर्व्हर रुममध्ये घुसले.

- Advertisement -

त्यानंतर त्यांनी सर्व्हर बंद करून कर्मचार्‍यांना रुमच्या बाहेर काढलं. ४ जानेवारी रोजी पुन्हा त्यांनी सर्व्हर बंद करण्याचा प्रयत्न केला. दुपारी काचेच्या दरवाज्यातून काही विद्यार्थी आतमध्ये घुसले आणि त्यांनी सर्व्हर सिस्टीमची तोडफोड केली. त्यामुळे नोंदणीची सर्व प्रक्रिया थांबली. या दोन्ही प्रकरणात एफआयआर नोंदवण्यात आला आहे. ५ जानेवारी रोजी कँम्पसमध्ये हिंसक घटना घडली. दुपारी पेरियार हॉस्टेलमध्ये चेहरा झाकून आलेल्या काही जणांनी विद्यार्थांवर हल्ला केला. हल्लेखोरांच्या या गर्दीत आइशी घोषही होती. त्यानंतर काही विद्यार्थांनी साबरमती हॉस्टेलमध्येही हल्ला केला. त्यातीलही काही विद्यार्थ्यांची ओळख पटली आहे, असं गुन्हे अन्वेषण विभागाचे डीसीपी जॉय टिर्की यांनी म्हटलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -