घरदेश-विदेशजोधपूर रेल्वे स्थानक ठरले सर्वात स्वच्छ स्थानक

जोधपूर रेल्वे स्थानक ठरले सर्वात स्वच्छ स्थानक

Subscribe

देशातील ७ हजार ३४९ रेल्वे स्थानकांपैकी ठरले सर्वात स्वच्छ स्टेशन.

भारतातील रेल्वे स्थानकांवर कचरा आणि घाण उघड्यावर परसरलेली असल्याचे चित्र असचतांना रेल्वे स्थानकाच्या स्वच्छतेचे परिक्षण करण्यात आले. या परिक्षणाचा अहवाल नुकताच सादर केला असून त्यामध्ये राजस्थान राज्यातील जोधपूर स्थानक अव्वल ठरले आहे. क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया (क्यूसीआय) संस्थेतर्फे हे सर्व्हेक्षण करण्यात आले. यादीत जोधपूर स्टेशन A1 चा दर्जा देण्यात आला. या व्यतिरीक्त मारवार, फुलेरा आणि वारंगल स्टेशनला A दर्जा देण्यात आला. केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी ही यादी जाहीर केली. यादीत दुसऱ्या क्रमांकावर जयपूर आणि तिसऱ्या क्रमांकावर तिरुपती रेल्वे स्थानक आहे. मागीलवर्षी विशाखापट्टनम रेल्वे स्थानक हे अव्वल ठरले होते. रेल्वेस्थानकावरील स्वच्छतेवर भर देण्यासाठी या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली होती.

या उपक्रमामुळे गेल्या चार वर्षांमध्ये रेल्वे स्थानकावर स्वच्छता राखण्याचे प्रामान वाढल आहे. उपक्रम सुरु केल्यानंतर स्थानकावरुन कचरा गोळा करण्याची क्षमता वाढली आहे. २०१४ ला कचरा गोळा करण्याचे प्रमाण ३८ टक्क्याहून वाढून ८३ टक्के झाले आहे. – केद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल

रेल्वेद्वारे सुरु केलेल्या या सव्हेक्षणाचे हे तिसरे वर्ष आहे. रेल्वे स्थानकावरील स्वच्छतेत झालेला बदल मोजण्याच्या उद्देशाने दरवर्षी या सव्हेक्षणाचे आयोजन केले जाते. मागील वर्षीच्या सव्हेक्षणाबद्दल याची तुलना केल्यास मागील वर्षाच्या तुलनेत १०० रेल्वे स्थानकावरील स्वच्छता सुधारल्याचे दिसून आहे. या स्थानकांच्या स्वच्छतेमध्ये १४ टक्क्यांची वाढ दिसून आली. उत्तर पश्चिम रेल्वे, दक्षिण मध्य रेल्वे आणि पूर्व रेल्वे परिमंडळ हे प्रथम स्थानावर आहेत.

- Advertisement -

या सर्व्हेक्षणात रेल्वे स्थानकाजवळील परिसर, फलाट, ट्रेन, प्रसाधन गृह आणि त्यांच्या बाहेरील जागांचे परिक्षणानंतर करण्यात आले आहे. या यादीत देशातील प्रमुख शहरामध्ये असलेले रेल्वे स्थानकही सामिल आहेत. या उपक्रमाला रेल्वे प्रशासनाने उत्तम प्रतिसाद दिला आहे. या उपक्रमामुळे येत्या काही काळात रेल्वे स्थानकावर स्वच्छता वाढेल अशी अपेक्षा पियुष गोयल यांनी व्यक्त केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -