जो बायडेन आणि कमला हॅरिस यांचा शपथविधी २० जानेवारीला होणार

जो बायडेन आणि कमला हॅरिस यांचा शपथविधी २० जानेवारीला होणार

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकी संदर्भात संपूर्ण जगभरात चर्चा सुरू आहे. शनिवारी (दि. ७ नोव्हेंबर २०२०) रात्री अमेरिकेच्या राष्ट्रध्यपदाच्या निवडणुकीचा निकाल लागला. अमेरिकेला नवे राष्ट्राध्यक्ष मिळाले आहेत. डेमोक्रॅटिक पार्टीचे उमेदवार जो बायडेन यांनी राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत बाजी मारून त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना पराभूत केलं आहे. जो बायडेन यांच्या ऐतिहासिक विजयानंतर डेमोक्रॅटिक पार्टीने सत्तांतराची जोरदार तयारी सुरू केली आहे. अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांचा २० जानेवारी २०२१ राजी शपथविधी सोहळा पार पडणार आहे. याबाबतची माहिती दोघांनीही आपल्या अधिकृत ट्विट अकाऊंटवरून दिली आहे.

 

एकीकडे अमेरिकेत डेमोक्रॅटिक पार्टीच्या विजयानंतर उत्साहाचा माहोल आहे. पण दुसरीकडे रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आणि अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अजूनही हार मानण्यास तयार नाही आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणूक प्रक्रियेत घोटाळा झाल्याचा आरोप करून आपण विजयी झाला असल्याचा दावा केला आहे. जरी असे असले तरी सध्या राष्ट्राध्यक्ष आणि उपराष्ट्राध्यक्षांच्या शपथविधी सोहळ्याची जोरदार तयारी सुरू केली आहे.

वॉशिंग्टन पोस्टच्या वृत्तानुसार, सध्या राष्ट्राध्यक्ष आणि उपराष्ट्राध्यक्षांच्या शपथविधी सोहळ्याची तयारी सुरू झाली आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतल्यानंतर जो बायडेन लगेचच काही मोठे निर्णय घेऊ शकतात. यासाठी बायडेन यांच्या टीमने मोठी यादी तयार केली आहे, असे म्हटले जात आहे. तसेच महत्त्वाचे म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेले काही महत्त्वाचे निर्णय बायडेन रद्द करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या खुर्चीत विराजमान झाल्यानंतर कोरोना व्हायरस, आर्थिक मजबूत, नक्षली समानता आणि वातावरणातील बदल या विषयांना प्राधान्य देणार आहेत. तसेच कॅबिनेटमध्ये अनेक वेगवेगळ्या घटकांना प्रतिनिधित्व देण्यात येणार आहे.


हेही वाचा – आपण कोरोनाशी लढताना थकलो असू, पण कोरोना अजूनही थकलेला नाही – WHO