बॅडन्यूज! यामुळे जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सनने थांबवल्या कोरोना लसीच्या चाचण्या!

बॅडन्यूज! यामुळे जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सनने थांबवल्या कोरोना लसीच्या चाचण्या!

संपूर्ण जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातलं आहे. यामुळे कोरोना रोखण्यासाठी युद्ध पातळीवर अनेक देशात लस तयार करण्याचं काम सुरू आहे. यादरम्यान काहींना लस तयार करण्यात यश येत आहे तर काहींना अपयश येतं आहे. काही दिवसांपूर्वी ऑक्सफर्डची AZD1222 कोरोना लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी थांबवण्यात आली होती. आता अमेरिकेतील जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सननं कोरोना लसीच्या चाचण्या थांबवल्या आहे. कारण या लसीचे स्वयंसेवकांना साईड इफेक्ट झाले आहेत.

कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी अमेरिकेतील मॉर्डना, पीफायझर या कंपन्याप्रमाणे जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सननंही कोरोनावर लस निर्माण केली. पण या लसीचे स्वयंसेवकांच्या शरीरावर साईड इफेक्ट दिसून आल्यामुळे अचानक काही काळासाठी या लसीच्या चाचण्या थांबवण्यात आल्या आहेत.

दरम्यान सध्या या लसीच्या चाचण्या सुरू होत्या. जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सनच्या Ad26.COV2.S लसीचे दोन डोस घेतल्यानंतर देखील स्वयंसेवकांच्या शरिरावर कोणतेही साईड इफेक्ट दिसले नाहीत. तसेच स्वयंसेवकांना कोरोना विरोधात लढण्यासाठी या लसीचे सिंगल डोस दिल्यानंतर त्यांच्यामध्ये रोग प्रतिकारक शक्ती निर्माण झाली. म्हणून कोरोनावर ही लस प्रभावी असल्याचे मानले जात होते. पण आता जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सननं या लसीच्या चाचण्या थांबवल्याचे समोर आले आहेत. याबाबतचे वृत्त रॉयटर्सने दिले आहे.


हेही वाचा – डोनाल्ड ट्रम्प यांचा कोरोना अहवाल आला निगेटिव्ह