घरट्रेंडिंगव्हॉट्स अॅप वरील 'त्या' जोकने सुप्रीम कोर्टात हशा!

व्हॉट्स अॅप वरील ‘त्या’ जोकने सुप्रीम कोर्टात हशा!

Subscribe

कर्नाटक विधानसभेच्या सत्तास्थापनेवरून भाजप आणि काँग्रेसमध्ये चांगलीच जुंपली आहे. कर्नाटकच्या या नाट्यमय राजकारणामुळे सोशल मीडियावर जोक्स, मीम्स, मेसेजस फिरत आहेत. त्यापैकी एक आज सुप्रीम कोर्टात सुनावणी वेळी माझ्याकडे ११६ आमदारांचे संख्याबळ आहे. मला मुख्यमंत्री करा, असा जोक न्यायाधीश ए. के. सिक्री यांनी न्यायालयात सांगितला आणि कोर्टात हशा पिकला.

सुप्रीम कोर्टाने भाजपाला उद्या (१९ मे) कर्नाटक विधानसभेत बहुमत चाचणी करण्याचे आदेश दिले आहेत. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर आता उद्या भाजपा, काँग्रेस व जेडीएस या पक्षांना बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. भाजपाने उद्या बहुमत चाचणी न घेता सोमवारी घ्यावी, अशी मागणी न्यायालयाकडे केली आहे.

- Advertisement -

बहुमत चाचणीआधी काँग्रेस व जनता दल सेक्युलर या पक्षाने आपले आमदार राज्याबाहेर पाठवले आहेत. त्या आमदारांना यायला वेळ लागेल, असा युक्तिवाद भाजपाची बाजू मांडणारे अॅड. मुकुल रोहतगी यांनी केला. यावर न्या. सिक्री यांनी व्हॉट्सअॅपवरील विनोदाचा दाखला देत ईगलटोन रिसॉर्टचा मालकही सत्तास्थापनेचा दावा करतो. त्याच्याकडे ११६ आमदारांचे संख्याबळ आहे, असे सांगितले. आमदारांमुळे त्या रिसोर्टमालकाला आणि कर्मचाऱ्यांना तिथे प्रवेश करणे कठीण झाले आहे,  असेही त्यांनी नमूद केले. यानंतर सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने भाजपाची मागणी फेटाळून लावली आणि शनिवारीच बहुमत चाचणी घ्यावी, असे आदेश दिले. गुरूवारी (१७ मे) रोजी भाजपाचे नेते येडियुरप्पा यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती.

राज्यपालांनी येडियुरप्पा यांना सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिले होते. तसेच १५ दिवसात बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले होते. याविरोधात काँग्रेसने सुप्रीम कोर्टात धाव घेत राज्यपालांच्या निर्णयाच्या विरोधात याचिका दाखल केली होती. काँग्रेसच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -