घरदेश-विदेशशबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश नाहीच; नव्या वादाला सुरुवात

शबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश नाहीच; नव्या वादाला सुरुवात

Subscribe

शबरीमाला मंदिरामध्ये सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश द्यावा, या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ही महिलांना प्रवेश मिळाला नाही. दर्शन न घेता महिलांना परत जावे लागले आहे.

केरळच्या प्रसिध्द शबरीमाला मंदिरामध्ये महिला प्रवेशावरुन सुरु झालेला वाद थांबायचे नाव घेत नाहीये. आज देखील महिला अयप्पाचे दर्शन करुन शकल्या नाहीत. शबरीमाला मंदिरात महिला प्रवेशावरुन त्रावणकोर देवस्वोम मंडळाचे माजी अध्यक्ष पेरियार गोपालकृष्णन यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. शबरीमला मंदिर ही काही सेक्स टुरिझमची जागा नाही तर हे अयप्पाचं पवित्र स्थान आहे, असे वक्तव्य गोपालकृष्णन यांनी केले त्यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. शबरीमाला मंदिरामध्ये सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश द्यावा असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्यानुसार केरळचे अयप्पा मंदिर बुधवारी मासिक पुजेसाठी उघडण्यात आले. मात्र तेव्हापासून महिलांना प्रवेश देण्यावरुन तणाव निर्णाण झाला आहे. या तणावपूर्ण वातावरणाला आता हिंसकरुप आले आहे.

- Advertisement -

दोन महिलांनी मंदिरात प्रवेश करण्याचा केला प्रयत्न

शबरीमाला मंदिरात जर महिलांनी प्रवेश केला तर आम्ही मंदिराला टाळे ठोकू अशी धमकी पुजाऱ्यांनी दिली होती. मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी एक महिला पत्रकार कविता आणि एक महिला समाजसेविका रेहाना फतिमा या दोघी पोलिसांच्या बंदोबस्तात आल्या होत्या. मंदिराच्या द्वारापर्यंत त्या गेल्या मात्र घटनास्थळावरुन होणारा विरोध आणि धमक्यांमुळे या महिलांना परत जावे जागले. उपस्थित असलेल्या पोलिसांना देखील या आंदोलकांना हटवता आले नाही.

- Advertisement -

न्यायालयाच्या आदेशाचा पालन करु

तर दुसरीकडे सीपीआईएमचे नेता कोडियेरी बालकृष्णन यांनी असे सांगितले की, आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करु इच्छित आहोत. आधी काँग्रेस शबरीमाला मंदिरामध्ये सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश मिळावा असे म्हणत होते. मात्र आता आम्ही सत्तेत आल्यानंतर काँग्रेस महिला प्रवेशाच्या विरोधात आंदोलन करत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला लक्षात घेता अनेक उपाययोजना केल्या गेल्या होत्या मात्र भाजप यामध्ये अडथळा आणत आहे.

पोलीसांच्या बंदोबस्तात येऊनही प्रवेश नाही

दरम्यान, आज सकाळी मंदिरात प्रवेश करण्यासाठी दोन महिला हेल्मेट घालून २५० पोलिसांच्या ताफ्यासोबत मंदिराच्या दिशेने आल्या. मात्र, पोलिसांसह आलेल्या या महिलांना आंदोलकांनी विरोध केला. त्यांना मंदिरात प्रवेश करण्यास मज्जाव केला. आंदोलकांच्या विरोधाला पाहून या महिलांनी शेवटी मंदिरात प्रवेश न करता माघार घेत परत गेल्या.

मंदिराला कुलूप लावू

महिलांनी परत जावे अन्यथा आम्ही मंदिराची दारे बंद करू असा इशारा मंदिराच्या मुख्य पुजाऱ्यांनी दिला आहे. माझा भक्तांना पाठिंबा आहे. मंदिराला कुलूप लावून चाव्या द्यायच्या आणि येथून निघून जाण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. याशिवा कोणताही पर्याय नाही, असे मुख्य पुजारी कंदारू राजीवारू यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -