घरदेश-विदेशपत्रकार रवीश कुमार यांचा 'रॅमन मॅगसेसे' पुरस्काराने गौरव

पत्रकार रवीश कुमार यांचा ‘रॅमन मॅगसेसे’ पुरस्काराने गौरव

Subscribe

एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीचे मॅनेजिंग एडीटर पत्रकार रवीश कुमार यांना 'रॅमन मॅगसेसे' पुरस्कार जाहीर झाला आहे. आशिया खंडातील 'रॅमन मॅगसेसे' पुरस्कार हा नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जातो.

सत्ताधाऱ्यांविरोधात निर्भिडपणे बोलणारे एनडीटीव्हीचे पत्रकार रवीश कुमार यांना मानाचा समजला जाणारा ‘रॅमन मॅगसेसे’ पुरस्कार जाहीर झाला आहे. पत्रकारिता क्षेत्रात आपली वेगळीचं ओळख रवीश कुमार यांनी निर्माण केली आहे. ते सध्या एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीचे मॅनेजिंग एडीटर आहेत. रॅमन मॅगसेसे हा पुरस्कार आशिया खंडातील नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जातो. ज्यांनी आपल्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे अशा आशियातील व्यक्तींचा हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते.

रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळाणारे रवीश कुमार हे सहावे पत्रकार आहेत. या अगोदर १९६१ साली अमिताभ चौधरी, १९७५ साली बीजी वर्गीय, १९८२ साली अरुण शौरी, १९८४ साली आर के लक्ष्मण आणि २००७ साली पी साईनाथ यांनी हा पुरस्कार मिळाला होता.

- Advertisement -

फिलीपीन्सचे माजी राष्ट्रपती रॅमन मॅगसेसे यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दिला जातो. पुरस्कार संस्थेने टि्वट करून या पुरस्काराबाबत जाहीर केलं आहे. सामान्य जनतेचे प्रश्न रवीश कुमार यांनी एनडीटीव्हीवरील प्राईम टाईम कार्यक्रमामध्ये मांडले. १९९६ पासून ते एनडीटीव्ही वृत्तवाहिनीत काम करत आहेत.

- Advertisement -

रवीश कुमार यांच्यासोबत म्यानमारमधील पत्रकार को स्वी वीन, थायलंडच्या अंगखाना नेलापाजीत, फिलिपिन्सच्या रेम्युंडो पुतांजे सायाबयाब आणि दक्षिण कोरियामधील किम जाँग की यांना हा मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -