Video : …म्हणून सर न्यायाधीशांने भर कोर्टात घेतले बाळाला कडेवर

कोर्टात आई शपथ घेत असताना चक्क न्यायाधीशांने बाळाला कडेवर घेऊन सांभाळल्याचा सध्या व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

Washington
Judge holds baby while his mom takes oath to become lawyer
कोर्टात आई शपथ घेताना चक्क न्यायाधीशांने घेतले बाळाला कडेवर

कोर्ट कचेरी म्हटलं की त्या कोर्टात होणारे एकमेकांवर आरोप आणि प्रत्यारोप आणि सर न्यायाधीशाचे ऑर्डर…ऑर्डर…पण एका कोर्टात चक्क न्यायाधीश ऑर्डर…ऑर्डर…न करता एका बाळाला कडेवर घेऊन त्याला सांभाळत असल्याचे दिसत आहे. हे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटले असेल ना. पण हे खरं आहे. ही घटना वॉशिंग्टनमध्ये घडली असल्याचे समोर आले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

काय आहे या व्हिडिओत

या व्हिडिओमध्ये सर न्यायाधीश रिचर्ड डिकिन्स हे महिला वकिल ज्युलियाना लामार यांना वकिलाची शपथ घेण्यास सांगत आहे. मात्र, ज्युलियाना यांनी कोर्टात येताना आपल्या लहान बाळाले घेऊन आल्या होत्या. दरम्यान, सर न्यायाधीश यांनी त्यांना वकिलाची शपथ घेण्यास सांगितले. त्यावेळी आपल्या बाळाला कुठे ठेवायचा असा प्रश्न त्यांना पडला असावा आणि त्याचवेळी सर न्यायाधीश डिकिन्स यांनी त्या बाळाला आपल्याकडेवर घेऊन ज्युलियाना यांना वकिलाची शपथ दिली. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून आतापर्यंत ६ लाख ९६ हजार लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. तर ५७ हजार १०७ लोकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे. तर १० हजार १६६ युजर्सने रिट्विट केले आहे.

काही दिवसांपूर्वी ज्युलियाना लामार यांनी हा व्हिडिओ इन्स्टाग्रावर पोस्ट केल्यानंतर त्यांनी शालेय मैत्रीण सारा मॉर्टिन यांने हा व्हिडिओ ट्विट केला आहे. त्यानंतर हा व्हिडिओ चांगलाच चर्चेत आला आहे.


हेही वाचा – …आणि गो एअरचं प्रवासी विमान थेट शेतात घुसलं!