घरदेश-विदेश'एनजीटी'च्या अध्यक्षपदी ए. के. गोयल यांची नियुक्ती

‘एनजीटी’च्या अध्यक्षपदी ए. के. गोयल यांची नियुक्ती

Subscribe

‘नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल’ (एनजीटी) च्या अध्यक्षपदी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ए.के. गोयल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मंत्रीमंडळ समितीने शुक्रवारी हा निर्णय घेतला. ही नियुक्ती पुढील पाच वर्षांसाठी करण्यात आली आहे. गोयल यांचा उच्चन्यायालयात काम करण्याचा काल शेवटचा दिवस होता. एनजीटीचे पूर्वअध्यक्ष न्यायमूर्ती स्वंतत्र कुमार यांचा कार्यकाल मागीलवर्षी डिसेंबर महिन्यात संपला होता. मागील काही महिन्यांपासून हे पद रिक्त असल्याने गोयल यांची नियुक्ती करण्यात आली.

न्यायमूर्ती ए. के. गोयल हे १९७४ पासून वकिली करत आहेत. पंजाब आणि हरियाणा येथील उच्चन्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात २० वर्षे त्यांनी काम केले. २००१ च्या सप्टेंबर महिन्यात न्यायाधिश पदी त्यांची नियुक्ती करण्यात आली. २०११ मध्ये गुजरात न्यायालयात त्यांची बदली करण्यात आली. चार महिन्यांनतर त्यांची नियुक्ती मुख्य न्यायाधिश पदी करण्यात आली. ऑक्टोबर २०१३ मध्ये ओडिशा उच्च न्यायालयात बदली करण्यात आली असून जूलै २०१४ साली त्यांची सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती करण्यात आली होती. ‘नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल’ची स्थापना २०१० साली करण्यात आली. पर्यावरणाच्या संवर्धनावर लक्ष ठेवण्यासाठी याविगाची सुरुवात करण्यात आली होती.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -