काँग्रेसची पार्श्वभूमी असलेल्या कंगनाच्या आईचा भाजप प्रवेश; शिवसेनेचा वाद ठरले निमित्त

Kangana ranaut mother joins bjp
कंगनाची आई आशा राणावतचा भाजपमध्ये प्रवेश

बॉलिवूडची अभिनेत्री कंगना राणावत आणि शिवसेनेमध्ये सुरु असलेल्या ट्विटर वॉर नंतर एकमेकांना आव्हान देण्याची मालिका सुरु झाली होती. त्यानंतर शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई महानगरपालिकेने कंगनाचे मुंबईतील कार्यालयावर जेसीबी चालवला होता. या घटनेनंतर व्यथित झालेल्या कंगनाच्या आईची हिमाचल प्रदेशच्या भाजप पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली. या भेटीदरम्यान कंगनाची आई आशा राणावत यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे कंगनाच्या आईने यावेळी सांगितले की, “आमचे कुटुंब हे मुळ काँग्रेसी विचारधारेचे आहे. पण सध्या आमच्यावर जो बाका प्रसंग आलाय त्यात मोदी सरकारने आमचे मन जिंकले आहे.”

आशा राणावत यांनी कंगनाला पाठिंबा दिल्याबद्दल मोदी सरकार आणि हिमाचल सरकारचे आभार व्यक्त केले. आमचे कुटुंब हे काँग्रेसी धारणेचे होते. कंगनाचे आजोबा सरजू राम मंडी हे गोपालपूर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार राहिलेले आहेत. मात्र बदलत्या परिस्थितीत आता राणावत कुटुंबीय भाजपकडे झुकले आहेत. कंगनाला सुरक्षा पुरविल्याबद्दल आशा राणावतने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आभार व्यक्त केले.

कंगनाच्या कार्यालयावर मुंबई महानगरपालिकेने कारवाई केल्यानंतर आशा राणावत यांनी शिवसेनेवर टीका केली. त्या म्हणाल्या की, “उद्धव ठाकरे यांनी माझी मुलगी कंगनाच्या कार्यालयावर नाही, तर स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या आत्म्यावर घाव केला आहे.” आज महाराष्ट्र सरकार माझ्या मुलीच्या विरोधात उभी राहिली असताना भाजप आमच्या मदतीला धावला आहे.

हे वाचा – कंगना तर कंगना, आता तिची आई देखील शिवसेनेच्या विरोधात मैदानात