Video: फुटबॉल सामन्यात ‘कांगारुची’ एंट्री !

महिलांचा फुटबॉल सामना सुरु होता, खेळ रंगात आला होता आणि अचानक मैदानावर कांगारुची एंट्री झाली. कांगारुच्या अचानक येण्यामुळे एकच गोंधळ उडाला.

Mumbai
football
फोटो सौजन्य- daily-sun.com

एखाद्या खेळाचा सामना सुरु आहे, खेळ चांगलाच रंगात आला आहे आणि अशावेळी अचानक कोणीतरी मैदानात आलं तर? सगळ्या खेळाचा ‘खेळखंडोबा’ होईल. नुकताच ऑस्ट्रेलियामध्ये काहीसा असाच प्रकार घडला आहे. ऑस्ट्रेलियातील एका स्थानिक फुटबॉल मॅचमध्ये अचानक एक कांगारु घुसल्यामुळे चांगलाच गोंधळ उडाला. ऑस्ट्रेलियाच्या कॅनबेरा येथे खास महिलांची फुटबॉल मॅच आयोजित करण्यात आली होती. कुणाच्याच ध्यानीमनी नसताना हे कांगारु चक्क फुटबॉलच्या मैदानात दाखलं झालं. याप्रकाराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. नेटिझन्सकडून या व्हिडिओला भरपूर पसंती मिळते आहे.

पाहा व्हिडिओ : 

(व्हिडिओ सौजन्य- The Gauardian)

कांगारु बनला ‘गोलकिपर’ ! 

कॅनबेरा पार्लमेंट हाऊसपासून साधारण २ किलोमीटर अंतरावर असलेल्या मैदानामध्ये ही मॅच ठेवण्यात आली होती. कॅनबेरा फुटबॉल क्लब आणि बेलकॉनेन युनायडेट ब्लू डेव्हिल्स या २ महिला संघांमध्ये ही फुटबॉल मॅच सुरु होती. मॅच सुरु झाल्यानंतर काही वेळातच एक कांगारु अचानक कुंपण ओलांडून मैदानात आलं आणि उड्या मारत मारत थेट गोलपोस्टजवळ जाऊन पोहोचलं. कांगारुच्या अशा धडक एंट्रीमुळे महिला खेळाडू आणि मैदानावर उपस्थित अन्य लोकांची धावपळ झाली. त्यामुळे सहाजिकच मॅच थांबवावी लागली. एकूण २० मिनिटांसाठी हा सामना थांबवण्यात आला कारण तर गोलपोस्टजवळ गेलेलं कांगारु तिथून हटण्याचं नावच घेत नव्हतं. त्यामुळे कांगारु गोलकिपरची भूमिका बजावत असल्याचं अनेकांनी म्हटलं. कांगारुच्या या करामतीमुळे सर्वांचीच हसून हसून पुरेवाट झाली.

दरम्यान, ऑस्ट्रेलियातील स्थानिक अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार एखादा प्राणी अशाप्रकारे मनुष्य वस्तीत येण्याचा हा प्रकार दुर्मिळ आहे. फुटबॉल मैदानावर ठाण मांडलेल्या या कांगारुला पकडण्यासाठी पोलीसांची गाडी मैदानावर दाखल झाली. मात्र, त्या कांगारुने पोलिसांनाही चांगलच हैराण करुन सोडलं. आज दिवसभर सोशल मीडियावर हा धमाल व्हिडिओ व्हायरल होत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here