CoronaVirus – अभिनेत्री कनिकाची पाचवीही टेस्ट पॉझिटीव्ह!

कनिका कपूर 9 मार्चला लंडनमधून भारतात परतली होती. त्यांनंतर जवळपास 10 दिवस ती वेगवेगळ्या लोकांना भेटली. याशिवाय तिनं एक हायप्रोफाइल पार्टी सुद्धा अटेंड केली होती.

Mumbai
kanika kapoor

कोरोना व्हायरसची लागण सामान्यांप्रमाणे सेलेब्रेटींनाही बसला आहे. सध्या भारतात कनिका कपूर ही कोरोना पॉझिटीव्ह असलेली भारतीय एकमेव सेलेब्रेटी आहेत. कनिकाची नुकतीच करण्यात आलेली पाचवीही कोरोना व्हायरस टेस्टही पॉझिटिव्ह आली आहे.  कनिकाच्या याआधी घेण्यात आलेल्या सर्व टेस्ट पॉझिटीव्ह आल्या होत्या. कनिका सध्या लखनऊच्या संजय गांधी पोस्ट ग्रेजुएट इंस्टीट्यूटमध्ये उपचार घेत आहे. तिचा चौथा रिपोर्ट सुद्धा पॉझिटिव्ह आल्यानं तिच्या कुटुंबीयांची चिंता वाढली आहे. 20 मार्चला कनिका हॉस्पिटलमध्ये भरती झाली होती.

कनिका कपूर 9 मार्चला लंडनमधून भारतात परतली होती. त्यांनंतर जवळपास 10 दिवस ती वेगवेगळ्या लोकांना भेटली. याशिवाय तिनं एक हायप्रोफाइल पार्टी सुद्धा अटेंड केली होती. त्यानंतर 20 मार्चला कोरोनाची लागण झाल्याची माहिती तिनं सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली होती. यामध्ये तिनं आपण लंडनमधून परतल्यावर ठिक होतो मात्र मागच्या 2 दिवसांपासून मला कोरोनाची लक्षणं दिसू लागली असं म्हटलं होतं. मात्र तिच्या निष्काळजीपणासाठी आणि इतर लोकांच्या आरोग्यशी खेळल्याबाबत उत्तरप्रदेशमध्ये तिच्या विरोधात FIR दाखल करण्यात आली होता.

कनिकाने केली होती तक्रार

करोनाची चाचणी पॉजिटिव्ह आल्यानंतर कनिकाला लखनौमधल्या एका रुग्णालयात आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे. मात्र, या रुग्णालयात आपल्याला चांगली वागणूक दिली जात नाही, असा दावा कनिकाने केला आहे. ‘मी सकाळी ११ वाजेपासून इथे आहे. पण मला पिण्यासाठी फक्त एक छोटी बाटली पाणी दिलं गेलं आहे. मी खायला मागितलं, तर मला फक्त छोटी केळी आणि संत्री देण्यात आली. त्यांच्यावर देखील माश्या बसल्या होत्या. मला खूप भूक लागली आहे आणि मी माझं औषध देखील घेतलेलं नाही. मला ताप आला आहे. मी त्यांना सांगितलं, पण त्यांनी माझ्याकडे लक्ष दिलं नाही. मी माझ्यासोबत आणलेलं अन्न देखील त्यांनी घेतलं. मला अॅलर्जी असल्यामुळे ते जे खायला देत आहेत, ते मी खाऊ शकत नाही’, अशी तक्रार कनिकाने केली होती.

कनिकाच्या या पोस्टवर डॉ. एक धामन म्हणाले, कानिकाच्या तब्येतीत सुधारणा होत आहे. तीला औषध आणि अन्न वेळेवर दिली जात आहेत. सोशल मीडियावर तीच्या तब्येती विषयी जे लिहण्यात आलं ते खोटं आहे. तीची टेस्ट निगेटीव्ह आल्यावरच तीला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात येईल.