घरदेश-विदेशकानपूर गोळीबार प्रकरण : पोलिसांनी केले अमर दुबेचे एन्काऊंटर

कानपूर गोळीबार प्रकरण : पोलिसांनी केले अमर दुबेचे एन्काऊंटर

Subscribe

काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशमध्ये पोलीस पथकावर झालेल्या अंदाधुंद गोळीबारात उपअधीक्षकासह आठ पोलिसांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. कानपूर येथे पोलीस विकास दुबे या गुंडाला अटक करण्यास गेले असता ही चकमक उडाली होती. त्यानंतरपासूनच पोलीस विकास दुबेचा शोध घेत आहेत. या प्रकरणी पोलिसांनी विकास दुबेचा खास असलेल्या अमर दुबेचा एन्काऊंटर केल्याची घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशच्या स्पेशल टास्क फोर्सच्या वतीने हमीरपूर येथे ही चकमक झाली. या चकमकीत दोन पोलीस जखमी झाल्याची माहितीह समोर येत आहे. यासंबंधीचे वृत्त एएनआय युपीने ट्विटवरून दिले आहे.

- Advertisement -

काय आहे घटना 

उत्तर प्रदेशमध्ये पोलीस पथकावर झालेल्या अंदाधुंद गोळीबारात उपअधीक्षकासह आठ पोलिसांचा मृत्यू झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी समोर आली होती. कानपूर येथे पोलीस विकास दुबे या गुंडाला अटक करण्यास गेले असता ही चकमक उडाली होती. दरम्यान, विकास दुबे याच्यावर ६० हून अधिक गुन्हे दाखल असून पोलीस बिकरु गावात विकास दुबेच्या शोधात गेले असता गुंडांकडून त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. यामध्ये पोलीस उपअधीक्षकासह आठ पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. यात पोलीस उपअधीक्षक देवेंद्र मिश्रा यांच्यासह तीन पोलीस उपनिरीक्षण आणि चार कॉन्स्टेबल यांचा मृत्यू झाला होता.

- Advertisement -

हेही वाचा –

कोरोनाच्या काळात राज्यात नोकरीच्या जम्बो संधी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -