घरदेश-विदेशकर्नाटक निवडणुकांचा लोकसभेवर होणार 'हा' परिणाम!

कर्नाटक निवडणुकांचा लोकसभेवर होणार ‘हा’ परिणाम!

Subscribe

ईशान्येकडील राज्यांमध्ये भाजपने विजय मिळविला असला तरी ही राज्ये तशी आकाराने छोटी आहेत. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालावर देशातील राजकीय वाटचाल निश्चित होणार आहे. कर्नाटकमध्ये भाजपला विजय मिळाल्यास लोकसभेची निवडणूक लवकर होणार हे निश्चित चित्र आहे. लोकसभेबरोबरच काही राज्यांच्या विधानसभा निवडणुका एकत्रित घेण्याची भाजपची योजना आहे. लोकसभेची मुदत मे महिन्यात संपत असली तरी कर्नाटक जिंकल्यास भाजपचे नेते या वर्षांअखेर मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगडबरोबर लोकसभेची निवडणूक घेण्याचा विचार करू शकतात. अथवा पुढील वर्षांच्या सुरुवातीला निवडणूक होऊ शकते. कर्नाटकात काँग्रेसने सत्ता कायम राखल्यास गुजरातपाठोपाठ कर्नाटक या मोठ्या राज्यात फटका बसल्यास भाजपचे नेते लोकसभा निवडणुकीची घाई करणार नाहीत.

भाजपसाठी पश्चिम बंगाल, तामिळनाडू, ओडिसा, केरळ ही राज्ये आव्हानात्मक आहेत. याबरोबरच गेली १५ वर्षे सत्ता असलेल्या मध्य प्रदेशातही आव्हान भाजपपुढे असणार आहे. राजस्थानमध्ये वसुंधरा राजे यांच्यामुळे वातावरण विरोधात तयार झाले आहे. राजस्थानमध्ये आलटूनपालटून सत्ताबदल होत असल्याची स्थिती आहे. ईशान्येतील विजयाने भाजपची हवा तर तयार झाली आहे. लोकसभा निवडणुकीपर्यंत ही हवा कायम ठेवावी लागेल.

- Advertisement -

राजकारणामध्ये २०१७ हे वर्ष विरोधी पक्षांसाठी फार चांगले गेले नाही. मात्र २०१८ हे वर्ष भारतीय राजकारणासाठीचे अत्यंत महत्त्वाचे वर्ष ठरणार आहे. २०१७ मध्ये भाजपने पंजाबचा अपवाद वगळता उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, मणिपूर या राज्यांमध्ये सरकार स्थापन केले. अर्थात गोवा आणि मणिपुरमध्ये काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. मात्र अन्य पक्षांना सोबत घेऊन भाजपने सत्ता मिळवली.

कर्नाटक
दक्षिणेत भाजपला पहिल्यांदा सत्ता देणाऱ्या कर्नाटकमध्ये पुन्हा एकदा बाजी मारण्यासाठी पक्षाने जोरदार तयारी केली आणि त्यानुसार निवडणुकीच्या आधीच बी. एस. येडीयुरप्पा यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी जाहीर केले.

- Advertisement -

मध्य प्रदेश
राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता मिळवण्याचा भाजपचा प्रयत्न असेल. शिवराजसिंह चौहान यांच्या नेतृत्वाखाली भाजपने दोनवेळा निवडणूक जिंकली आहे. राज्य सरकारवर घोटाळे आणि भ्रष्टाचाराचे नवे नवे आरोप होत आहेत. त्यामुळे भाजप समोर अनेक आव्हाने आहेत.

छत्तीसगड
मध्य प्रदेश प्रमाणे येथे देखील 2003पासून भाजप सत्तेत आहे. रमण सिंह गेली 3 टर्म मुख्यमंत्री आहेत. यंदाच्या निवडणुकीत काँग्रेस सत्ताधाऱ्यांच्या विरोधातील वातावरणाचा फायदा उठवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र काँग्रेस नेत्यांमधील वादामुळे त्यात कितपत यश मिळेल याबाबत शंका आहे.

राजस्थान
सरकारविरोधातील जनतम, अनेक वाद आणि पक्षातील मतभेद या कारणांमुळे राजस्थानमध्ये पुन्हा सत्ता मिळवणे भाजपसाठी मोठे आव्हान ठरणार आहे. मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात असंतोष दिसत असल्यामुळे याचा फायदा काँग्रेसला होऊ शकतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -