हे काय नवीन? करिनाला करायचं होतं राहुल गांधींना डेट

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिथे करिना काँग्रेसचा चेहरा बनण्याची चर्चा होती, तिथे तिची इतकी जुनी मुलाखत पुन्हा एकाद व्हायरल होत आहे. 

Mumbai
Kareena wanted to date Rahul Gandhi, viral truth

बॉलीवूडची ‘बेबो’ अर्थात करिना कपूर खानला काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दिली जाणार, अशी शक्यता गेल्या काही दिवसांपासून वर्तवली जात होती. मात्र, दुसरीकडे आता करिना एका नव्या कारणामुळे सध्या चर्चेत आली आहे. ‘काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना मला एकेकाळी डेट करायचं होतं’, असं वक्तव्य करिना कपूरने केलं होतं. सिमी गिऱ्हेवाल हिला दिलेल्या मुलाखतीत तिने ही इच्छा बोलून दाखवली होती. करिनाचा ‘रेफ्युजी’ हा चित्रपट २००० साली रिलीज झाला होता. त्यानंतर मुलाखतकार सिमी गिऱ्हेवालने करीनाची मुलाखत घेतली होती. या मुलाखतीमध्ये ‘तुला जर जगातील एका पुरुषाला डेटसाठी निवड सांगितलं गेलं तर तू कोणाची निवड करशील?’ असा प्रश्न करिनाला विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना करिनाने राहुल गांधी यांचं नाव घेतलं होतं.

या मुलाखतीमध्ये करिना म्हणाली होती की, ‘हे म्हणणं कितपत योग्य आहे मला माहित नाही पण मला राहुल गांधींना डेट करायला आवडेल. त्यांचे फोटो मी मासिकांमध्ये सतत पाहत असते. ते अशा घरात जन्माला आले आहेत ज्या घराला राजकारणाचा वारसा आहे. तर मी अशा घरात जन्माला आली आहे ज्या घराला सिनेमाचा वारसा आहे. त्यामुळे मला त्यांना डेट करण्याची, त्यांच्याशी राजकारणाविषयी बोलायची आणि त्यांच्याकडून राजकारणाबद्दल जाणून घ्यायची इच्छा आहे’. ज्यावेळी ही मुलाखत प्रसारित झाली होती त्यावेळी राहुल गांधीही ऐन तारुण्यात होते आणि राजकारणात प्रवेश करण्याच्या वाटेवर होते.

दरम्यान आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिथे करिना काँग्रेसचा चेहरा बनण्याची चर्चा होती, तिथे तिची इतकी जुनी मुलाखत पुन्हा एकाद व्हायरल होत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here