पोटनिवडणुकीत भाजपचं वर्चस्व, येडियुरप्पा सरकारकडेच बहुमत!

Bangalore
B S Yeddyurappa
कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा

काही दिवसांपूर्वी कर्नाटकमध्ये काँग्रेस आणि जेडीएसच्या १७ आमदारांनी आपापल्या पक्षांना सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे कुमारस्वामी सरकार पूर्णपणे कोसळले. त्यानंतर भाजपने कर्नाटकमध्ये सत्ता स्थापन केली. मात्र, राजीनामा देणाऱ्या १७ आमदारांना विधानसभेच्या सभापतींना अपात्र ठरवले. त्यामुळे कर्नाटकात १५ मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक घेण्यात आली. ५ डिसेंबर रोजी १५ मतदारसंघांमध्ये मतदान झाले. आज सकाळी आठ वाजेपासून ११ मतदारसंघांमध्ये मतमोजणी करण्यात आली. पोटनिवडणुकीत भाजपचं वर्चस्व कायम राहिल्यामुळे येडियुरप्पा सरकारकडेच बहुमत राहिले असून कॉंग्रेस आणि जेडीएसला मोठा धक्का बसला आहे.