घरताज्या घडामोडीराजीव गांधी पुण्यतिथी: शेकडो काँग्रेस कार्यकर्ते जमले एकत्र; सोशल डिस्टन्सिंगचा उडवला फज्जा!

राजीव गांधी पुण्यतिथी: शेकडो काँग्रेस कार्यकर्ते जमले एकत्र; सोशल डिस्टन्सिंगचा उडवला फज्जा!

Subscribe

देशात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत अनेक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी लॉकडाऊन आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम उल्लंघन केल्याचे समोर आले आहे. माजी पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी यांच्या पुण्यातिथी निमित्ताने कर्नाटकमधील बेंगळूरु मध्ये शेकडोच्या संख्येने आज काँग्रेसचे कार्यकर्ते श्रद्धांजली देण्यासाठी एकत्र जमले होते. यादरम्यान ना कोणी मास्क घातला होता ना कोणी सोशल डिस्टन्सिंगच पालन करत होत.

- Advertisement -

गेल्या २४ तासांत देशात १३२ जणांचा मृत्यू झाला असून ५ हजार ६०९ कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत देशातील कोरोनाबाधितांचा आकडा १ लाख १२ हजार ३५९वर पोहोचला आहे. यापैकी ६३ हजार ६२४ अॅक्टिव्ह रुग्ण असून ३ हजार ४३५ जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिली आहे. देशात सर्वाधिक कोरोनाचा फैलाव महाराष्ट्रात झाला आहे. महाराष्ट्रातील आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३९ हजारच्या पुढे गेली आहे. २४ तासांत राज्यात ६५ रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या १ हजार ३९० झाली आहे.

महाराष्ट्राच्या पाठोपाठ तमिळनाडू हे दुसरे सर्वाधिक कोरोनाबाधित राज्य आहे. तमिळनाडूत एका दिवसात ७४३ कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्याची १३ हजारच्या पुढे आहेत. देशात तिसऱ्या क्रमांकावर गुजरात राज्य असून १२ हजारहून अधिक कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. देशातील कोरोनाबाधितांच्या यादीत कर्नाटक १३ व्या क्रमांकावर आहे. कर्नाटकांतील कोरोनाबाधितांची संख्या १ हजार २६२ आहे. कर्नाटकच्या अशा परिस्थितीत काँग्रेच्या नेत्यांनी लॉकडाऊन आणि सोशल डिस्टन्सिंग पालन न करणे ही गंभीर बाब आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Coronavirus: ब्राझीलमध्ये कोरोनाचा हाहाकार; गेल्या २४ तासांत १९ हजार १५१ नवे रुग्ण!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -