घरदेश-विदेशयेडियुरप्पा राहणार की जाणार?

येडियुरप्पा राहणार की जाणार?

Subscribe

महाराष्ट्रात सर्वाधिक जागा मिळवून देखील भाजप सत्ता स्थापन करू शकली नाही. राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची महाराष्ट्र विकास आघाडी सत्तेत असून आता कर्नाटकात काँग्रेस चमत्कार घडवणार का याकडे देशाचे लक्ष लागले आहे. त्यामुळे कर्नाटकात येडियुरप्पा सरकार राहणार की कोसळणार हे उद्या ठरणार आहे. कर्नाटक विधानसभेच्या नुकताच पार पडलेल्या १५ जागांच्या पोटनिवडणुकीचा सोमवारी निकाल लागणार आहे.

सकाळी आठ वाजता मत मोजणीला सुरुवात होणार असून दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होईल, असे निवडणूक अधिकार्‍याने सांगितले. ११ मतदान केंद्रावर मतमोजणी होणार असून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. काँग्रेस आणि जेडीएस सरकारमधील १७ आमदारांनी बंडखोरी केल्याने जुलै महिन्यात एच .डी . कुमारस्वामी यांचे सरकार कोसळले होते. त्यानंतर कर्नाटकात बी. एस येडियुरप्पा यांच्या नेतृत्वात भाजप सरकार आले. भाजपचे १०५ आमदार असून सत्ता कायम ठेवण्यासाठी त्यांना आणखी ६ आमदारांची गरज आहे. पोटनिवडणुकीत १५ पैकी १२ जागा या काँग्रेस आणि ३ जागा जेडीएसने लढवल्या आहेत. २२४ सदस्य संख्या असलेल्या विधानसभेतील संख्याबळ २०८ पर्यंत कमी झाल्यानंतर येडियुरप्पा यांनी १०५ आमदारांसह विश्वासदर्शक ठराव जिंकला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -