घरदेश-विदेशकर्नाटक : कुमारस्वामींचे सरकार राहणार की जाणार?

कर्नाटक : कुमारस्वामींचे सरकार राहणार की जाणार?

Subscribe

कर्नाटकातील कुमारस्वामींचे सरकार संकटात आले असून आज, गुरुवारी विधानसभे विश्वासदर्शक ठराव मांडण्यात येत आहे. त्यामुळे आजचा दिवसा कुमारस्वामी यांच्या सरकारसाठी खुपच महत्त्वाचा आहे. सरकारला विधानसभेत त्यांचे बहुमत सिद्ध करायचे आहे. मात्र १५ बंडखोर आमदारांनी राजीनामे दिल्यामुळे त्याचे सरकार अल्पमतात गेले आहे. या दरम्यान एन. महेश हे बसपाचे आमदार अनुपस्थित राहिले आहेत. एन. महेश यांनी सांगितले की, काँग्रेस-जेडीएस सरकारने मायावती यांच्याशी कोणताही संपर्क साधला नाही. त्यामुळे ते त्यांच्या मतदार संघात राहणार आहेत.

- Advertisement -

कर्नाटक विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडताना काँग्रेस-जेडीएसच्या आमदारांनी गोंधळ घातला.

- Advertisement -

विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडताना कुमारस्वामी म्हणाले की, मी फक्त याकरता आलो नाही की या मुद्द्यावर प्रश्न उपस्थित होत आहेत की मी युतीची सरकार चालवू शकतो का नाही. काही आमदारांकडून स्पीकरची भूमिका खराब करण्याचा प्रयत्न सुरु आहे. आपल्याला कर्नाटकच्या विकासाच्या दृष्टीने प्रयत्नशील राहायला हवे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -