घरदेश-विदेशकर्नाटकच्या माजी मुख्यमंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य; लोकांनी केले ट्रोल

कर्नाटकच्या माजी मुख्यमंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य; लोकांनी केले ट्रोल

Subscribe

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. या वक्तव्यामुळे मोठा वाद होण्याची शक्यता आहे.

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे. सिद्धरामय्या त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यासाठी प्रसिद्ध आहेत. गेल्यावेळी त्यांनी एक महिलेसोबत गैरप्रकार केला होता. त्यामुळे लोकांनी त्यांना प्रचंड ट्रोल केले होते. आता पुन्हा नेटीझन्सकडून त्यांना ट्रोल केले जात आहे. त्यामागील कारणही अगदी तसेच आहे. सिद्धरामय्या यांनी कर्नाटकाच्या बदामी ठिकाणी भाषण करताना वादग्रस्त विधान केले आहे. ‘कुंकवाचा टिळा आणि भस्म लावणाऱ्या लोकांची मला भीती वाटते’, असे वक्तव्य त्यांनी केले आहे. याच वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर त्यांना सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केले जात आहे.

‘सिद्धरामय्यांचे वक्तव्य हिंदूविरोधी’

कर्नाटकात लिंगायत समाज मोठ्या प्रमाणात आहे. या समाजाचे पुरुष डोक्याला कुंकवाचा टीळा आणि भस्म लावतात. दरम्यान, काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि कर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे. ‘निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सिद्धरामय्या यांनी केलेले हे वक्तव्य हिंदूविरोधी आहे, हिंदूचा अपमान करणारे आहे’, अशी प्रतिक्रिया उमटत आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -