घरदेश-विदेशआणि नववधू आली जेसीबीतून सासरी!

आणि नववधू आली जेसीबीतून सासरी!

Subscribe

कर्नाटकात घोडा, गाडी किंवा रथावरुन वरात न काढता चक्क जेसीबीवरुन वरात काढण्यात आली आहे. त्यामुळे हे लग्न चर्चेचा विषय ठरले आहे.

लग्न म्हटलं की हळदी पासून वरातीपर्यंत सर्वकाही आलं. भारतासारख्या देशात लग्नातील प्रत्येक परंपरा मोठ्या उत्साहात साजरी होताना आपण पाहतो. विशेषतः वरातीच्या बाबतीत पाहीलं तर सजवलेली गाडी, रथ किंवा घोडा, कुठे बँजो तर कुठे डिजे अशी वरात आपल्या डोळ्यासमोर येते. कर्नाटकमध्ये मात्र एक अजब वरात पाहायला मिळाली आहे. या नववधूंच्या वरातीत गाडी-घोडा काही नव्हते. या नवऱ्याने चक्क जेसीबीतून नवरीची वरात आणलेली पाहायला मिळाली. या वरातीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून सध्या या लग्नाची चर्चा सर्वत्र सुरु आहे.

जेसीबीतून काढली लग्नाची वरात

पुत्तूलच्या परपुंजा तालुक्यात राहणाऱ्या चेतन आणि ममता यांचे नुकतेच लग्न झाले. नवरदेव चेतन याचा जेसीबी चालवण्याचा व्यवसाय आहे. चेतनने आधीपासूनच स्वत:च्या लग्नात काहीतरी वेगळे करायचे ठरवले होते. त्यानुसार त्याने जेसीबीमधून लग्नाची वरात घेऊन जायचे ठरवले. लग्न समारंभ पार पडल्यानंतर नवरा-नवरी आपल्या कुटुंबासोबत हॉलच्या बाहेर पडले. नवरीने बाहेर आल्यावर पाहिले असता. दारात गाडी-घोडा नसून चक्क जेसीबी उभा होता. ते पाहून नवरीला नवल वाटले. मात्र नवऱ्याने तिला जेसीबीच्या बकेटमध्ये बसण्यास सांगितले आणि त्यांची जेसीबीमधून वरात घराच्या दिशेने निघाली.

- Advertisement -

वरात ठरली चर्चेचा विषय

आपले लग्न हटके आणि वेगळ असावे असे नवरदेवाच्या डोक्यात होते. त्यानुसार त्यांनी सुरुवातीपासून काहीतरी वेगळे करण्याचे ठरवले होते. चेतन व्यवसायाने जेसीबी चालक असून आपली वरात देखील जेसीबीमधूनच घेऊन जायची असे त्याने ठरवले. त्यानुसार त्यांनी मित्रांच्या साहाय्याने जेसीबी सजवला आणि आपल्या लग्नाची वरात जेसीबीमधून काढली. ही वरात हॉलमधून निघाल्यानंतर गावातील मंडळींसाठी वरात एक आकर्षण ठरली असून या वरातीची सोशल मीडियातून मोठ्या प्रमाणात चर्चेचा विषय ठरला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -