घरदेश-विदेशकर्नाटकचा जनादेश भाजपसोबतच - अमित शहा

कर्नाटकचा जनादेश भाजपसोबतच – अमित शहा

Subscribe

कर्नाटक निवडणुकीनंतर अनेक उलथापालथी झाल्या. निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरल्यानंतर दोनच दिवसांत बी.एस येडियुरप्पा यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यायला लागला. यादरम्यान भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी कोणतेही वक्तव्य केले नव्हते. आज दिल्ली येथील भाजप कार्यालयात पत्रकार परिषदेत त्यांनी कर्नाटकाच्या मतदार आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले. काँग्रेस आणि जेडीएसला कर्नाटकच्या जनतेने नाकारले आहे. काँग्रेस १२२ जागांवरून ७८ जागांवर खाली आली आहे. मग कोणत्या आधारावर काँग्रेस जल्लोष करते आहे हे कळायला मार्ग नाही, अशी टीका शहा यांनी यावेळी केली. हा जल्लोष सत्तापिपासू काँग्रेस-जेडीएसचा असून कर्नाटकच्या जनतेमध्ये या सरकारबद्दल कोणताही जल्लोष नाही.
कर्नाटकच्या जनतेने काँग्रेसच्या भ्रष्टाचाराला वैतागून भाजपला मतदान केले. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासहित काँग्रेसचे अर्धे मंत्रीमंडळ निवडणुकीत गारद झाले आहे. म्हणूनच कर्नाटकच्या जनतेने सर्वाधिक जागा दिल्या. भाजपच्या मतांच्या टक्केवारीतही यावेळी वाढ झाली असल्याचे शहा म्हणाले.

ती ऑडियो क्लिप खोटी
भाजप नेत्यांनी काँग्रेसच्या आमदारांना १०० कोटींची ऑफर दिली असल्याची अफवा काँग्रेसने पसरवली होती. सुप्रीम कोर्टातील याचिकेच्या सुनावणीवर प्रभावा पडावा असा त्या अफवेमागील उद्देश होता. आज काँग्रेसच्या नेत्यांनीच असा कोणताही दुरध्वनी आला नसून ती एक अफवा असल्याचे कबूल केले आहे, असा दावा अमित शहा यांनी केला.

- Advertisement -

आमच्याबद्दल जाणीवपूर्वक अपप्रचार
बहुमत नसतानाही भाजपने जबरदस्ती सरकार स्थापन केला, असा अपप्रचार केला जात असल्याचे शहा म्हणाले. आम्हाला सर्वात जास्त जागा मिळाल्या आहेत. त्रिशंकू परिस्थिती झाली असताना पुन्हा निवडणूक घ्यायची का? आम्ही जर सरकार बनवण्यासाठी पुढाकार घेतला नसता तर कर्नाटकाच्या जनतेने जो कौल दिला त्याचा अवमान झाला असता.

इंधन दरवाढीच्या प्रश्नावर अमित शहांची सोयीस्कर बगल
यावेळी कर्नाटक निवडणूक होईपर्यंत पेट्रोल-डिझेलचे दर वाढले नव्हते. मात्र निकाल जाहीर होताच इंधनाचे दर अचानक वाढले असून यावर भाजपची भूमिका काय? असा प्रश्न अमित शहा यांना यावेळी पत्रकारांनी विचारला. या प्रश्नावर अमित शहा भलतेच चिडले. मला तुमचा अजेंड माहित असून आज फक्त कर्नाटक निवडणुकीच्याबाबतीच बोलणार असल्याचे सांगत शहा यांनी या प्रश्नाला सोयीस्कर बगल दिली.

Kishor Gaikwadhttps://www.mymahanagar.com/author/kishor/
एकेकाळी कार्यकर्ता होतो (कोणता ते विचारू नका) आता पत्रकार झालोय. तटस्थ वैगरे आहेच. पण स्वतःला पुरोगामी वैगरे म्हणवून घेतो. तसा राहण्याचा प्रयत्नही करतो. लिहायला, वाचायला, फिरायला आवडतं. सध्या सर्व वेळ टोरंटवर जातोय. बाकी इथे लिहितच राहिल. नक्की वाचा... आपला मित्र किशोर गायकवाड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -