घरदेश-विदेशअंधश्रद्धेमुळे ते रोज करतात ३४२ किमी प्रवास

अंधश्रद्धेमुळे ते रोज करतात ३४२ किमी प्रवास

Subscribe

कर्नाटकाचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एच. डी. रेवन्ना यांना त्यांच्या अंधश्रद्धेमुळे दररोज ३७२ किलोमीटरचा फेरा मारावा लागत आहे.

अंधश्रद्धा माणसाला कुठल्या थरावर नेवून ठेवेल याचा काही नेम नाही. सध्या याच अंधश्रद्धेच्या विळख्यात कर्नाटकाचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रेवन्ना अडकले आहेत. रेवन्नांना या अधंश्रद्धेमुळे रोज ३४२ किलोमीटरचा प्रवास करावा लागत आहे. ज्योतिषाने त्यांना राहते घर सोडल्यास त्यांच्या जीवाला धोका असल्याचे सांगितले आहे. ज्योतिषांनी दिलेल्या माहितीनुसार रेवन्ना मंत्री झाल्यानंतर बंगळुरुला राहायला गेले तर स्वत:च्या मालकीच्या घरात राहू शकत नाही. कारण तिथे त्यांच्या जीवाला धोका उद्भभू शकतो. बंगळुरुच्या शासनाने दिलेल्या बंगल्यात मात्र त्याना हा धोका उद्भवू शकत नसल्याचे ज्योतिषाने त्यांना सांगितले आहे.

बंगळुरुचा सरकारी बंगल्यात राहायची इच्छा

बंगळुरुच्या कुमारकृपा पार्क ईस्ट येथील गांधी भवन जवळ एक सुंदर सरकारी बंगला आहे. या बंगल्यामध्ये सध्या काँग्रेसचे नेते एच. सी. महादेप्पा राहत आहेत. रेवन्ना यांची याच बंगल्यात राहण्याची इच्छा आहे. कारण, त्यांचे म्हणणे आहे की, त्यांच्या राजनैतिक भविष्यासाठी तो बंगला लाभदायक ठरु शकतो. परंतु, त्यांना अजूनपर्यत तो बंगला मिळाला नाही, त्यामुळे त्यांना दररोज ३४२ किलोमीटरचा प्रवास करावा लागत आहे. ते रोज सकाळी ५ वाजता उठतात आणि सकाळी ८ वाजता बेंगळुरु पासून १७० किलोमीटर लांब होलनरसीपुरा जिल्ह्यातील आपल्या राहत्या घराहून बंगळुरुल यायला निघतात. रस्त्याला लागणाऱ्या मंदिरांचे दर्शन घेत ते ११ वाजेपर्यत बंगळुरुला पोहचतात. दिवसभराचे काम आटोपून ते संध्याकाळी ८.३० वाजता घराकडे निघतात. संध्याकाळी पुन्हा १७० किलोमीटरचा प्रवास करुन ते घरी रात्री ११ वाजता पोहचतात.

- Advertisement -

ज्योतिषांवर त्यांचा विश्वास

रेवन्ना यांचा वास्तुशास्त्रावर खुप विश्वास आहे. ते कुठलेही काम ज्योतिषाला विचारल्याशिवाय करत नाही. ज्योतिषाच्या सांगण्यावरुनच ते होलनरसीपुरामध्ये राहायला गेले होते. एच. डि. कुमारस्वामी यांची शपथविधी, कॅबिनेट विस्तार, विधानसभेचे अधिवेशन, आर्थिक बजेट या सगळ्यांसाठी दिवस आणि वेळ त्यांनी ठरवली आहे. त्यांच्याच सांगण्यावरुन कुमारस्वामी शपथविधीसाठी चप्पल न घालता गेले होते. विधान भवनाचे इतर सदस्य देखील रेवन्ना यांना विचारुनच योग्य ते निर्णय घेतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -