घरदेश-विदेशकर्नाटकच्या काँग्रेस आमदारांवर सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु

कर्नाटकच्या काँग्रेस आमदारांवर सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु

Subscribe

कर्नाटकातून अचानक गायब झालेले आमदार श्रीमंत पाटील मुंबईच्या सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असल्याची माहिती समोर आली आहे.

कर्नाटकातील काँग्रेसचे आमदार श्रीमंत पाटील यांना सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये प्रकृती बिघडल्यामुळे दाखल करण्यात आलं आहे. अचानक छातीत दुखू लागल्याने गुरुवारी उपचारांसाठी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. हॉस्पिटल प्रशासनाकडून ही माहिती देण्यात आली आहे. बुधवारी रात्री कर्नाटकचे आमदार श्रीमंत पाटील अचानक गायब झाल्यामुळे मोठी खोळबळ उडाली. काँग्रेसने त्यांचा शोध घेण्यासाठी दहा टीम आखल्या. काँग्रेसने विमानतळावर देखील त्यांना सोधले. गुरुवारी सकाळी ते एका हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्याची माहिती समोर आली. मात्र, ते हॉटस्पिटल कुठले? याची माहिती समोर आलेली नव्हती. ती माहिती आता समोर आली आहे. श्रीमंत पाटील सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.

‘हॉस्पिटलमध्ये कडेकोट बंदोबस्त’

‘श्रीमंत पाटील यांच्या छातीत दुखू लागल्याने उपचारासाठी त्यांना सेंट जॉर्ज रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. त्यांच्या सोबत कार्यकर्तेही आहेत. त्यांच्या छातीत दुखत असल्याने ईसीजी आणि अन्य तपासण्या करण्यात आल्या असून शुक्रवारीही या तपासण्या करण्यात येणार आहेत’, अशी माहिती हॉस्पिटल प्रशासनाकडून देण्यात आली आहे. हॉस्पिटलबाहेर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – अचानक गायब झालेले कर्नाटकचे आमदार मुंबईत सापडले


 

- Advertisement -

कर्नाटकात राजकीय नाट्य

श्रीमंत पाटील अचानक गायब झाल्यामुळे कर्नाटकच्या राजकीय नाट्याला वेगळे लागण्याची शक्यता वर्तवली जात होती. याशिवाय पाटील अचानक गायब होऊन बंडखोर आमदारांमध्ये सामील झाल्याची धास्ती काँग्रेसला वाटत होती. त्यासाठी त्यांचा शोध घेण्यासाठी काँग्रेसने फार प्रयत्न केला. अखेर श्रीमंत पाटील मुंबईतील हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असल्याची माहिती समोर आली.


हेही वाचा – कर्नाटक राजकीय नाट्य; आमदार श्रीमंत बाळासाहेब पाटील गायब

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -