घरदेश-विदेशकर्नाटक : आणखी ५ आमदारांची सर्वोच्च न्यायालयात धाव

कर्नाटक : आणखी ५ आमदारांची सर्वोच्च न्यायालयात धाव

Subscribe

कर्नाटकच्या राजकीय घडामोडींनी आता वेगळेच वळण घेतले आहे. काँग्रेस- जेडीएसच्या १० बंडखोर आमदारांनंतर जेष्ठ काँग्रेस नेते रोशन बेग आणि आमदार आनंद सिंह यांच्यासह पाच आमदारांनी विधानसभा अध्यक्ष के. आर. रमेश कुमार यांच्यावर प्रश्चचिन्ह उपस्थित केले आहे. विधानसभा अध्यक्ष मुद्दाम राजीनामे स्वीकारत नसल्याचा आरोप आमदारांनी केला आहे. के. आर. रमेश कुमार विधानसभा अध्यक्षाची संवैधानिक जबाबदारी योग्य रित्यापार पाडत नसल्याचा आरोप करत आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

यापूर्वी १० बंडखोर आमदारांनी विधानसभा अध्यक्ष के. आर. रमेश कुमार यांच्याविरुद्ध सर्वोच न्यायालयात याचिका दाखल केली होती. सर्वोच न्यायालयाने आपल्या सुनावणीत बंडखोर आमदारांच्या राजीनाम्यावर योग्य कारवाई करण्याचे आदेश दिले होते. या बाबतीत पुढील सुनावणी मंगळवार १६ जुलै रोजी होणार आहे. तर दुसरीकडे कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी सभागृहात विश्वास मत सिद्ध करण्याची परवानगी विधानसभा अध्यक्ष के. आर. रमेश कुमार यांना मागितली आहे.

- Advertisement -

मागील आठवड्यात काँग्रेस- जेडीसच्या १३ आमदारांनी राज्य सरकारच्या कारभारावर नाराजी व्यक्त करीत आमदारकीचा राजीनामा दिला होता. २२५ सदस्य असलेल्या कर्नाटक विधान सभेत काँग्रेसचे ७९ तर जनता दल (सेक्युलर) चे ३७ आमदार आहेत. मागील महिन्यात झालेल्या कुमारस्वामी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात दोन अपक्ष आमदारांचा समावेश करण्यात आला होता. त्यामुळे सत्ताधारी काँग्रेस आणि जेडीएस मधील बरेचसे आमदार नाराज असल्याचे समजते. विशेष म्हणजे कर्नाटकच्या  राजीनामा सत्राची सुरवात आमदार आनंद सिंह यांनीच केली होती. तर जेष्ठ काँग्रेस नेते रोशन बेग यांना पक्षविरोधी वक्तव्य केल्या बद्दल निष्काषित करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -