घरदेश-विदेशकर्नाटक विषबाधा प्रकरण : प्रसादात १५ किटकनाशकाच्या बॉटल मिसळल्या

कर्नाटक विषबाधा प्रकरण : प्रसादात १५ किटकनाशकाच्या बॉटल मिसळल्या

Subscribe

प्रसादाच्या जेवणामध्ये तब्बल १५ बॉटल किटकनाशक मिसळण्यात आले होते. या विषबाधा प्रकरणी मंदिराच्या मंहत आणि त्याच्या तीन साथिदारांना अटक केली आहे.

कर्नाटक येथील सुलवाडी गावात किछुगुट्टी मरम्मा मंदिरात प्रसादातून झालेल्या विषबाधेत आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू झाला आहे तर १०० पेक्षा अधिक जणांवर अद्यापही उपचार सुरु आहेत. या विषबाधा प्रकरणाच्या तपासातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रसादाच्या जेवणामध्ये तब्बल १५ बॉटल किटकनाशक मिसळण्यात आले होते. या विषबाधा प्रकरणी मंदिराच्या मंहत आणि त्याच्या तीन साथिदारांना अटक केली आहे. विश्वस्तांना हटवून मंदिराच्या पैशावर नियंत्रण मिळवण्यासाठी मंदिराच्या महंताने हा कट रचला असल्याचे तपासातून समोर आले आहे.

आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू

४ डिसेंबरला कर्नाटकातील कोल्लेगलमधील सुलवाडी गावातील मंदिराच्या पायाभरणीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्रसाद वाटण्यात आला. या प्रसादामध्ये आरोपींनी १५ किटकनाशकांच्या बॉटल मिसळल्या होत्या प्रसाद खाल्यानंतर ११ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर अनेकांना उलट्या, जुलाब, पोटदुखी, मळमळण्याचा त्रास होऊ लागल्याने त्यांना उपचारासाठी वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारा दरम्यान आणखी ४ जणांचा मृत्यू झाला. याप्रकणात आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू झाला आहे तर अद्याप १०० जणांवर उपचार सुरु आहेत.

- Advertisement -

आरोपींनी गुन्ह्याची दिली कबुली

या विषबाधा प्रकरणी पोलिसांनी मंदिराच्या महंत इम्मादी महादेवा स्वामी आणि त्याच्या तीन साथिदारांना पोलिसांनी अटक केली आहे. चौकशी दरम्यान आरोपींनी पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांनी गुन्हा कबूल केला. आरोपींविरोधात हत्या, हत्येचा प्रयत्न याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विषबाधेच्या घटनेच्या आठ दिवस आधी मगंताची प्रेयसी अंबिकाच्या घरी एक कृषी अधिकारी आला होता. हा कृषी अधिकारी अंबिकाचा नातेवाईक होता. आपण अंबिकाला किटकनाशकांच्या ५०० एमएलच्या दोन बाटल्या दिल्या होत्या असे या कृषी अधिकाऱ्याने पोलिसांना सांगितले.

विश्वस्ताला हटवण्यासाठी कृत्य

बगीच्यातील वनस्पतींसाठी किटकनाशके हवी आहेत असे अंबिकाने आपल्याला सांगितले होते. प्रसादातून विषबाधेमुळे इतक्या लोकांचे मृत्यू झाल्याचे समजल्यानंतर त्याने अंबिकाला फोन केला. तेव्हा तिने आपण महंताच्या सांगण्यावरुन हे सर्व केल्याचे सांगितले. अंबिका आणि महंत एकाच गावात राहतात. त्यांचे अनैतिक संबंध आहेत. तामिळनाडू-कर्नाटक सीमेवरील या मंदिरातून वर्षाला १२ लाख रुपये उत्पन्न मिळते. अलीकडेच मंदिराच्या मुख्य विश्वस्ताने इम्मादी महादेवा स्वामीचा प्रस्ताव धुडकावून लावला होता. त्यामुळे विश्वस्ताला हटवण्यासाठी हा सर्व प्रकार करण्यात आला असल्याची कबूली आरोपींनी केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – 

कर्नाटक मंदिर विषबाधा प्रकरण, वैमनस्यातून प्रसादात कालवले वीष

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -