घरदेश-विदेशशीख भाविकांना कर्तारपूर साहिबला जायला व्हिसा लागणार नाही

शीख भाविकांना कर्तारपूर साहिबला जायला व्हिसा लागणार नाही

Subscribe

भारत आणि पाकिस्तानमध्ये आज करतार कॉरिडॉरच्या संबंधी एक महत्त्वाची बैठक पार पडली. या उच्चस्तरीय बैठकीत भारताच्या अनेक मागण्या पाकिस्तानकडून मान्य झाल्या आहेत. या बैठकीचे सर्वात मोठे फलित म्हणजे आता शीख भाविकांना कर्तारपूर साहिब येथे जाण्यासाठी व्हिसाची गरज लागणार नाही. भारतीय पासपोर्ट धारक आणि ओसीआई कार्डधारकांना वर्षभर विना व्हिसा प्रवास करता येणार आहे. रोज पाच हजार भाविक येथे दर्शनाला जाऊ शकतात. तर विशेष प्रसंगी दहा हजार भाविकांना प्रवेश दिला जाणार आहे.

- Advertisement -

पाकिस्तानमधील रावी नदीच्या पलीकडे नरोवाल जिल्ह्यात करतारपुर साहिब गुरुद्वारा आहे. या गुरुद्वारात शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक देव यांनी आपल्या जीवनातील अखेरचे क्षण घालवले होते. हे स्थान शीख धर्मींयासाठी अत्यंत पवित्र मानले जाते. बैठक संपल्यानंतर गृह मंत्रालयाचे संयुक्त सचिव एससीएल दास यांनी सांगितले की, पाकिस्तानमधील कर्तारपूर साहिब येथे दर्शनासाठी परवानगी मिळाली आहे. प्रवेश शुल्काबाबतही सकारात्मक चर्चा झाली आहे. भाविकांची सोय करण्यासाठी पाकिस्तान कटिबद्ध असून यात्रा सुरु असताना भारताविरोधी एकही घटना घडणार नाही, असे आश्वासन पाकिस्तानकडून देण्यात आले आहे.

- Advertisement -

या बैठकीत पाकिस्तानच्यावतीने परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते मोहम्मद फैसल यांनी सहभाग घेतला होता. या बैठकीत ८० टक्के मुद्द्यावर सकारात्मक चर्चा झाली असून उर्वरित विषयांवर पुन्हा एकदा बैठक घेऊन अंतिम निर्णय घेऊ, असे फैसल यांनी सांगितले आहे. नोव्हेंबर २०१९ मध्ये गुरु नानक देव यांची ५५० वी जयंती आहे. यासाठी रावी नदीवर एक पुल बांधण्यासाठी पाकिस्तानने सहमती दर्शवली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -