घरदेश-विदेशकरुणानिधी अंत्यदर्शन: दोघांचा मृत्यू , ४० जखमी

करुणानिधी अंत्यदर्शन: दोघांचा मृत्यू , ४० जखमी

Subscribe

करुणानिंधींच्या अंत्ययात्रेमध्ये अनेक राजकीय नेते सहभागी झाले होते अशीही माहिती समोर आली आहे.

तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि द्रविड मुन्नेत्र कळघम (द्रमुक) पक्षाचे अध्यक्ष एम. करुणानिधी यांचे मंगळवारी सायंकाळी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून गंभीर आजारी असलेल्या करुणानिधी यांनी काल चेन्नईच्या कावेरी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. दरम्यान आज त्यांचे पार्थिव चेन्नईच्या राजाजी हॉलमध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवले असताना एक अनुचित प्रकार घडला. अंत्यदर्शनासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात आलेल्या लोकांमध्ये चेंगराचेंगरी झाली ज्यामध्ये २ लोकांचा मृत्यू झाला तर जवळपास ४० लोक जखमी झाले. दरम्यान या धावपळीदरम्यान जखमी झालेल्या सर्वांनाच उपचारासाठी जवळच्या रुग्णालयाच दाखल करण्यात आले आहे. अचानक झालेल्या या धावपळीमुळे अंत्ययात्रेसाठी राजाजी हॉलमधून बाहेर काढलेले करुणानिधी यांचे पार्थिव काही काळासाठी पुन्हा हॉलमध्ये न्यावे लागले. परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर पुन्हा एकदा करुणानिधी यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात झाली.

पाहा नेमका प्रकार व्हिडिओद्वारे :

 

- Advertisement -

अंतयात्रा मार्गस्त

चेन्नईतील मरिना बीचवर करुणानिधी यांच्यावर अंत्यविधी करण्यात येणार आहेत. करुणानिधी यांचा दफनविधी मरिन बीचवर करावा की नाही? यावरुन सुरुवातीला वाद निर्माण झाले होते. मात्र, अखेर मद्रास हायकोर्टाने यासाठी परवानगी दिली. दरम्यान बरेच तास चाललेल्या करुणानिधींच्या अंत्ययात्रेमध्ये लाखोंच्या संख्येने लोक उपस्थित होते. त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी खूप मोठा जनसागर लोटला होता. करुणानिंधींच्या अंत्ययात्रेमध्ये अनेक राजकीय नेते सहभागी झाले होते अशीही माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

हेही वाचा: ‘करुणानिधीं’ विषयी सर्वकाही, एका Click वर

 

सोशल मीडियावरुनही अनेक बड्या राजकीय नेत्यांनी करुणानिधी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, सपा प्रमुख अखिलेश यादव, RJD नेता तेजस्वी यादव, एनसीपी अध्यक्ष शरद पवार, जम्मू-कश्मीर के पूर्व मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला आणि कांग्रेस नेता प्रफुल्ल पटेल आदींनी ट्वीटरच्या माध्यमातून करुणानिधी यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

पोलीस बंदोबस्तात वाढ

दरम्यान अंत्यदर्शनादरम्यान घडलेल्या या अनुचित प्रकारामुळे, अंत्ययात्रेदरम्यान पोलिसांची सुरक्षा कित्येक पटीने वाढवण्यात आली होती. त्यांची अंतयात्रा ज्या-ज्या मार्गावरुन जाणार होती त्या सर्व मार्गांवरील पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली होती. अखेर पोलीसांच्या कडक सुरक्षा व्यवस्थेतून करुणानिधी यांची अंत्ययात्रा मरिना बीचवर पोहोचली.

हेही वाचा: करुणानिधी आणि जयललिता यांच्यातील विळ्या भोपळ्याचे नाते!

हेही वाचा: असा आहे करुणानिधींचा परिवार

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -