घरदेश-विदेशउत्तर प्रदेशमध्ये 'या' गावात महिला करवा चौथचे व्रत करत नाही

उत्तर प्रदेशमध्ये ‘या’ गावात महिला करवा चौथचे व्रत करत नाही

Subscribe

जाणून घ्या का करत नाही उत्तर प्रदेशातील महिला करवा चौथचे व्रत...

देशभर करवा चौथचे व्रत आणि त्याचा उपवास हिंदू धर्मातील अनेक महिला करत असतात. कोजागिरी पौर्णिमा झाल्यानंतर चंद्र दिसल्यानंतर अनेक सुहासिनी महिला हे व्रत करतात. हे व्रत उत्तर प्रदेशात मोठ्या प्रमाणात केले जाते. आपल्या पतीला उदंड आयुष्य लाभावे तसेच, महिलांचे सौभाग्याचे रक्षण व्हावे… याकरिता करवा चौथचे व्रत केले जाते. ही परंपरा शेकडो वर्षांपासून उत्तर प्रदेश राज्यात चालत आली आहे.

मात्र उत्तर प्रदेशमधील एका गावात याबद्दल निराशेचे वातावरण बघायला मिळत असून या राज्यातील महिला हे व्रत करतच नाहीत. उत्तर प्रदेश राज्यातील मथुरामधील सुरीर आणि विजाऊ या गावात ऐकेकाळी सतीने दिलेल्या शापाची भीती तेथील स्त्रियांच्या मनात इतकी घर करून आहे की, या गावातील महिला करवा चौथचा उत्सव साजरा करत नाही.

- Advertisement -

हे आहे व्रत न करण्याचे कारण

गेल्या २०० वर्षांपुर्वीपासून हे गाव शापात असल्याचे सांगितले जात आहे. या गावातील कोणत्याही महिलेने जर करवा चौथचे व्रत पाळले तर ती महिला आपला पती गमावते. २०० वर्षांपुर्वी एका ब्राम्हण महिलेने हा शाप या गावातील महिलांना दिला होता. या महिलेच्या पतीला करवा चौथ या व्रताच्या दिवशी तिच्या पतीला ग्रामस्तांनी चांगलीच मारहाण केली होती. यामुळे या ब्राम्हण महिलेने शाप दिल्याचे सांगण्यात येत आहे.

- Advertisement -

अशी आहे कथा

असे सांगितले जाते की, करवा चौथच्या दिवशी नवविवाहित ब्राम्हण महिला आणि तिचा पती विजाऊ या गावातून जात असताना या व्यक्तीवर बैल जोडी केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. यानंतर ती ब्राम्हण महिला सोबत असताना तिच्या पतीवर आरोप केल्यावर त्याला जीवे मारले.

यावेळी या महिलेने संपुर्ण गावाला शाप देत असे म्हटले की, करवा चौथच्या दिवशी येथील महिलेने आपल्या पतीसाठी जर व्रत केले तर त्या महिलेचा पती देखील मृत्यूमुखी पडेल. हा शाप या ब्राम्हण महिलेने सतीच्या मंदिराच्या पायरीवर दिला.

तेव्हा पासून याठिकाणी राहणाऱ्या महिला हे व्रत करत नाही. तसेच लग्नापुर्वी सतीच्या मंदिरात जाऊन पुरूष
प्रार्थना करतात. या गावातील महिला त्या ठिकाणी विकले जाणारे सिंदूर देखील विकत घेत नाही तर त्याच्या माहेराहून सिंदूर आणि टिकली आणून लावतात. मात्र, ज्या महिला या पंरपरेला छेद देतात किंवा या घटनेचा तिरस्कार करून व्रत करतात त्यावेळी त्या महिलेच्या पतीवर अचानक मृत्यू ओढावतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -