घरदेश-विदेशकाश्मीर हा द्विपक्षीय मुद्दा

काश्मीर हा द्विपक्षीय मुद्दा

Subscribe

भारत-पाक हे दोन्ही देश 1947पूर्वी एकच होते. काश्मीरसकट पाकिस्तानसोबत जे मुद्दे आहेत ते द्विपक्षीय मुद्दे आहेत. भारत-पाक द्विपक्षीय संबंधांतून काश्मीर प्रश्न आम्ही सोडवू, हा प्रश्न सोडवण्यासाठी कोणत्याही तिसर्‍या देशाला त्रास देणार नाही. आम्ही चर्चेच्या माध्यमातून या मुद्यावर तोडगा काढू, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना ठामपणे सांगितले.

फ्रान्समधील जी ७ परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. ट्रम्प आणि मोदी यांनी या भेटीत काश्मीरसह वेगवगेळ्या मुद्यांवर चर्चा केली. मोदींनी यावेळी ट्रम्प यांच्यासमोर काश्मीर हा भारत-पाकिस्तानमधला द्विपक्षीय मुद्दा असल्याचे सांगितले. दोन्ही देश आपसातील मतभेद सोडवतील, असा विश्वासही ट्रम्प यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

पण आता त्यांनी माघार घेतली आहे. भारत आणि पाकिस्तान त्यांचे मतभेद सोडवतील, असे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.काश्मीरवर चर्चा झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्टपणे जम्मू आणि काश्मीरमध्ये मानवाधिकाराचे उल्लंघन झाले नसल्याचे सांगितले आहे. या भेटीत भारत अमेरिका यांच्यातील व्यापाराबाबतही चर्चा झाल्याची माहिती आहे. चीन आणि अमेरिका यांच्यातील ट्रेड वॉरमुळे जगातील अन्य देशांना मंदीचा फटका बसू लागला आहे. यावरही चर्चा झाल्याचे ट्रम्प यांनी सांगितले.

काश्मीर मुद्यावर काल रात्री आम्ही बोललो. काश्मीरमधली परिस्थिती नियंत्रणात असल्याचे मोदींचे मत आहे. ते पाकिस्तान बरोबर चर्चा करून नक्कीचे काही तरी चांगले घडवून आणतील, असा विश्वास ट्रम्प यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द केल्यापासून पाकिस्तान आगपाखड करत आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान विजयी झाले तेव्हा त्यांना शुभेच्छा देताना आपण गरिबीविरोधात लढले पाहिजे हे बोललो होतो, असे नरेंद्र मोदी संयुक्त पत्रकार परिषदेत म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -