घरदेश-विदेशदिल्लीत केजरीवालच,आपची हॅट्ट्रिक?

दिल्लीत केजरीवालच,आपची हॅट्ट्रिक?

Subscribe

दिल्लीमध्ये पुन्हा एकदा केजरीवाल यांचेच सरकार येणार असून अरविंद केजरीवाल हे हॅट्ट्रिक करणार असल्याचा अंदाज एक्झिट पोलमधून व्यक्त करण्यात आला आहे. भाजपने केलेला जोरदार प्रचार आणि टीकेची आक्रमणे फिकी पडून आम आदमी पार्टीकडेच दिल्लीचा गड राहणार असल्याचा अंदाज आहे. दिल्लीमध्ये 2020 च्या विधानसभा निवडणुकीत एकूण 70 जागांपैकी आम आदमी पक्षाला 49 ते 63 जागा मिळण्याचा अंदाज आहे. या आकड्यानुसार पुन्हा एकदा केजरीवाल यांची एकहाती सत्ता दिल्लीत येण्याची चिन्हे आहेत. भाजपला यावेळी 5 ते 19 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर काँग्रेसला 0 ते 4 जागा मिळण्याचा अंदाज आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे अरविंद केजरीवाल यांना शह देण्यासाठी भाजपने उभे केलेल्या मनोज तिवारी यांची जागादेखील धोक्यात असल्याचे या सर्व्हेत सांगण्यात आले आहे.

दिल्ली विधानसभेसाठी 57 टक्के मतदान झाले. दिल्लीतील इतर भागात कमी, मध्यम असा प्रतिसाद मिळत असताना शाहीन बाग परिसरात मात्र नागरिकांनी मतदानाला भरभरून प्रतिसाद दिला आहे. सकाळपासूनच इथे मतदानासाठी गर्दी होती. मतदानाचे पॅटर्न पाहता याचा फायदा कोणाला होणार, फटका कोणाला बसणार याचा अंदाज सर्व्हेत देण्यात आला आहे. 2015 च्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीने 70 पैकी 67 जागांवर दणदणीत विजय मिळवत एकहाती सत्ता स्थापन केली होती. त्यावेळी भाजपला केवळ तीन जागा मिळाल्या होत्या, तर काँग्रेसला खातेदेखील उघडता आले नव्हते.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -