घरदेश-विदेशकिनाऱ्यावर सेल्फीच्या नादात आई दंग; डोळ्यांदेखत गमावला पोटचा मुलगा

किनाऱ्यावर सेल्फीच्या नादात आई दंग; डोळ्यांदेखत गमावला पोटचा मुलगा

Subscribe

रौद्र रूप धारण केलेल्या समुद्राच्या लाटेत हातून अडीच वर्षांचा मुलगा निसटला आणि ही दुर्दैवी घटना घडली.

अनेकांना सेल्फी काढण्याचे वेड असल्याचे आपण पाहिले आहे. मात्र सेल्फीचं खुळ असल्याने अनेकांनी आपला प्राण गमावला आहे. दरम्यान केरळमध्ये असाच दुर्दैवी प्रकार घडल्याचे समोर आले आहे. रविवारी केरळमधील अलप्पुझा समुद्रकिनारी आईसोबत गेलेला अडीच वर्षांचा मुलगा वाहून गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आदिकृष्णा असं या मुलाचं नाव असून मुलगा वाहून जात असताना मुलाची आई मोबाइलमध्ये सेल्फी काढण्यात दंग असल्याचे सांगितले जात आहे.

असा घडला प्रकार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केरळमधील पलक्कडमध्ये हे कुटुंब राहत असून निता मौली ही दोन दिवसांपूर्वी आपल्या मुलांना आणि भावाच्या मुलाला घेऊन अलप्पुझा येथे नातेवाईकांच्या घरी गेली होती. तिथे एक लग्नसोहळा होता. रविवारी दुपारी साधारण अडीच वाजता बीनू अनिता मौली आणि तिच्यासोबतच्या तीन मुलांना घेऊन अलप्पुझा समुद्रकिनारी फिरायला गेली होती. त्यावेळी समुद्राला भरती असल्याने समुद्र खवळलेला होता. त्यामुळे तिथे तैनात जीवरक्षकांनी त्यांना मुख्य तटावर जाण्यास मनाई केली. त्यानंतर ते अलप्पुझा ईएसआय हॉस्पिटलच्या जवळील किनारी गेले.

- Advertisement -

यावेळी बीनू कार पार्क करण्यासाठी गेल्या होत्या तेव्हा अनिता मौली किनाऱ्यावर उभ्या राहून मुलांसोबत सेल्फी काढत होत्या. अचानक मोठी लाट आली आणि रौद्र रूप धारण केलेल्या समुद्राच्या लाटेत ते सर्व त्यात अडकले. अनिता मौली यांच्या हातून अडीच वर्षांचा मुलगा आदिकृष्णा निसटला आणि ही दुर्दैवी घटना घडली.


अमानुषपणा! १० रुपयांचे आमिष दाखवत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -