घरदेश-विदेशकेरळला महाराष्ट्रातून पुन्हा औषधांचा पुरवठा

केरळला महाराष्ट्रातून पुन्हा औषधांचा पुरवठा

Subscribe

केरळ पुरग्रस्तांच्या मदतीकरीता वैद्यकीय महाराष्ट्रातून पुन्हा एकदा औषधांचा पुरवठा करण्यात आला आहे. केरळमध्ये नुकतीच औषध सामग्री घेऊन डॉक्टरांचे पथक धावून गेले आहेत.

केरळमध्ये वेगवेगळ्या परिसरात भरवण्यात आलेल्या आरोग्य शिबीरांमध्ये सध्या रुग्णांचा मोठया प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातून पुन्हा एकदा केरळमध्ये औषधांचा पुरवठा करण्यात आला आहे. केरळमध्ये नुकतीच औषधांची तिसरी तुकडी (ड्रग्ज कन्सायमेंट) पाठवण्यात आली असल्याची माहिती जे. जे रुग्णालयातील डॉ. संजय सुरासे यांनी दिली आहे.

केरळमध्ये सध्या पुराचं पाणी ओसरायला लागले आहे. त्यामुळे या परिसरात व्हायरल इन्फेक्शन पसरण्याची भीती डॉक्टर व्यक्त करतात. त्यामुळे या परिसरात जास्तीत जास्त औषधांची गरज भासणार आहे. इतकंच नव्हे तर आता महाराष्ट्र सरकारकडून केरळच्या ज्या भागात औषधांचा तुटवडा आहे, त्या भागात ही औषधे पुरवली जात आहेत. काही ठिकाणी पूरग्रस्त परिस्थितीत डॉक्टर उपलब्ध आहेत. मात्र ज्या ठिकाणी औषधे उपलब्ध नाहीत, अशाच ठिकाणी महाराष्ट्र सरकारकडून औषधांचे वाटप करण्यात आले आहे.

- Advertisement -

महाराष्ट्रातील‌ डॉक्टरांनी केली रुग्णांची तपासणी

महाराष्ट्रातील‌ डॉक्टरांनी आतापर्यंत केरळमधील जवळपास तीन हजारांहून अधिक लोकांची तपासणी केली आहे. तपासणी केलेल्या रुग्णांमध्ये सर्वात जास्त तापाचे रुग्ण आढळले आहेत. या रुग्णांना गोळ्या देण्यात आल्या आहेत.

या शहरांमध्ये आरोग्य शिबीर भरवले

केरळच्या प्रमुख तीन शहरांमध्ये आरोग्य शिबीर भरवण्यात आले आहेत. त्यानुसार डॉक्टर तिथल्या लोकांची चौकशी आणि तपासणी करून त्यांना औषध देत आहेत. जे‌.जे रुग्णालयातील डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, वेगवेगळ्या ठिकाणी भरवण्यात आलेलेल्या शिबिरांमध्ये ४०० हून अधिक लोकांची तपासणी करण्यात आली आहे. तर, दुसऱ्या टीमने कुडूनगल्लूरमध्ये ओपीडी आणि आपातकालीन परिस्थितीतील ५०० ते ६०० लोकांची तपासणी करण्यात आली.

- Advertisement -

मुंबईतील डॉक्टरांनी घेतला पुढाकार

एकीकडे जे.जे रुग्णालयातील डॉक्टर्स आरोग्य सेवा देण्यासाठी केरळमध्ये औषधांच्या साठ्यासह दाखल झाले आहेत. तर दुसरीकडे मुंबईतील अनेक रुग्णालयातील डॉक्टरांनीही मदतीचा हात पुढे केला आहे. केईएममधील डॉक्टरांनी एकत्र येऊन गरजेच्या वस्तू केरळमध्ये पाठवल्या आहेत. शिवाय काही निधी देखील उपलब्ध करून दिला आहे. केईएममधील जवळपास ९०० निवासी डॉक्टरांनी मिळून पूरग्रस्तवासियांना मदत केली आहे.

एफडीएनेही पाठवली औषधं

महाराष्ट्र सरकारने पुन्हा एकदा पुढाकार घेतला असून राज्याच्या अन्न आणि औषध विभागाकडून केरळमध्ये औषधं पाठवण्यात आली आहेत. यामध्ये सलाईन, इन्जेक्टेबल्स, कफ सिरप पाठवण्यात आली आहेत. गरज असताना आपण बाहेरच्या देशातही मदत करतो, मात्र ही परिस्थिती आपल्या देशातच आहे त्यामुळे आम्ही नक्कीच मदत करणार. औषधांशिवाय डॉक्टरही रूग्णांची योग्य प्रकारे काळजी घेऊ शकणार नाहीत. त्यामुळे ही मदत केली असल्याचे एफडीएकडून सांगण्यात आले आहे.

निवासी डॉक्टरांनी सहभाग घेऊन काही रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीत जमा केली आहे. एमबीबीएसच्या डॉक्टरांनी मिळून १७ हजार ३०० एवढी रक्कम जमा केली आहे. शिवाय कपडे, सॅनिटरी पॅड, बिस्किट्स संस्थांच्या माध्यमातून देण्यात आल्या आहेत. तसेच गरज पडल्यास आणखी देखील मदत करु.  – डॉ. आलोक सिंह, मार्ड अध्यक्ष, केईएम

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -