घरदेश-विदेशकेरळ सोन तस्करीतही दाऊदचा हात?; NIA ची कोर्टात माहिती

केरळ सोन तस्करीतही दाऊदचा हात?; NIA ची कोर्टात माहिती

Subscribe

केरळमधील सोन्याच्या तस्करी प्रकरणी भारताचा मोस्ट वॉन्टेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या टोळीचा सहभाग असल्याची शक्यता राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए)ने कोर्टात वर्तवली आहे. केरळमधील सोन्याच्या तस्करीतून मिळालेला पैसा हा राष्ट्रविरोधी आणि दहशतवादी कामे करण्यासाठी वापरला जातो, असे दहशतवाद विरोधी संस्था एनआयएने मिळालेल्या माहितीच्या आधारे यावेळी सांगितले. या प्रकरणातील आरोपींना जामीन मिळू नये, अशी  मागणीही त्यांनी कोर्टासमोर केली. या प्रकरणात दाऊद टोळीच्या संशयित भूमिकेचा तपास करण्याची आवश्यकता असल्याचे एनआयएने कोर्टाला सांगितले आहे.

काय आहे प्रकरण 

सोन्याच्या तस्करीतून मिळालेला पैसा राष्ट्रविरोधी कामे आणि दहशतवादी कृत्यांमध्ये वापरण्याची शक्यतेबाबत आमच्याकडे माहिती आली असल्याचे एनआयएने म्हटले आहे. या प्रकरणाचा तपास करण्याच्या दृष्टीने १८० दिवस सर्व आरोपींना न्यायालयीन कोठडीत ठेवणे अतिशय गरजेचे असल्याचेही त्यांनी नमूद केले. या प्रकरणातील एक आरोपी रमीस हा असून आपला टांझानिया देशात हिऱ्यांचा व्यापार असल्याची माहिती त्याने दिल्याचे एनआयएने म्हटले आहे. रमीस याने तस्करीतील सोने यूएईमध्ये विकले होते. यूएन सेक्युरिटी काउंसिल सँक्शन कमिटीकडून दाऊद इब्राहिमवर टिप्पणी केल्याची माहिती एनआयएने दिली.

- Advertisement -

हेही वाचा –

Whatsapp, Facebook, Amazon गोत्यात; सर्वोच्च न्यायालयानं धाडली नोटीस!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -