घरदेश-विदेशफेसबुकवरील कमेंट पडली महागात

फेसबुकवरील कमेंट पडली महागात

Subscribe

केरळ पुरस्थितीवर कमेंट केल्यामुळे ओमान येथून कामावरुन काढले.

केरळमध्ये पावसाचा जोर हळू हळू कमी होत चालला आहे. मात्र अजूनही बऱ्याच ठिकाणी पाणी साचले आहे. या पुरग्रस्तांना वाचवण्याचे प्रयत्न सरकारकडून होत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून जगभरात पूराचे अपडेट मिळत आहेत. ओमानमधील एका खाजगी कंपनीत काम करत असलेल्या कर्मचाऱ्याला फेसबुक कमेंट महागात पडली आहे. केरळमध्ये पुरस्थिती असून त्यावर फेसबुकवर आक्षेपार्ह कमेंट केल्यामुळे त्याला नोकरी गमवावी लागली आहे. राहुल चेरू पलायट्टु असे या तरुणाचे नाव असून तो मस्कत येथील लुलु ग्रुप ऑफ इंटरनेशनलमध्ये कॅशियर म्हणून कार्यरत होता. कंपनीचे मालक हे मुळचे केरळचे आहेत. फेसबुकवरील ग्रुपवर कमेंट केल्यामुळे मालकाने चिडून याला कामावरुन टाकले आहे. केरळमधील पूरानंतर या मलकाने आता पर्यंत १७.५ कोटींची मदत पाठवली असल्याची माहिती समोर आली आहे.

Screenshot comment
केलेल्या कमेंटचा स्क्रिनशॉर्ट

खलीज टाइम्स ने दिलेल्या वृत्तानुसार राहुलला कंपनीचे एचआर मॅनेजर नस्र मुबारक सलेम कडून एक पत्र मिळाले. केरळ पूरावर फेसबुकवर वादग्रस्त विधान केल्यामुळे तुमची सेवा रद्द केल्या जात असल्याचा मजकूर लिहिला होता. यावर राहुलने माफी मागीतली. अशा प्रकारची टिप्पणी पुन्हा करणार नाही असे ही त्यांनी सांगितले. मात्र एचआरने त्याला नोकरीवरुन जाण्यासाठी सांगितले. लुलु ग्रुपचे चीफ कम्युनिकेशन वी. नंदरकुमार यांनी सांगितले की,”केरळच्या परिस्थीती दरम्यान आमची संघटना त्यांच्या बरोबर उभी आहे. असंवेदनशील कमेंट केल्यामुळे त्याला कामावरुन काढून टाकण्याचा कठोर निर्णय घेतला.”

- Advertisement -

यापूर्वीही घडलेली घटना

गल्फ देशांमध्ये सोशल मीडियावर आक्षेपार्ह कमेंट करण्यापूर्वी काळजी बाळगावी. यापूर्वीही रमदानच्या महिन्यात मुस्लिम विरोधी कमेंट केल्यामुळे एका फाईस्टार हॉटेलमधून काढून टाकण्यात आले होते. नोकरीवरुन काढून टाकण्यात आल्यानंतर त्यांना त्या देशांमध्ये पुन्हा नोकरी मिळणे कठिण जाते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -