मी अजून जिंवत आहे

किकि चॅलेंज न करण्याचे आवाहन पोलिसांडून करण्यात आले होते. आवाहनात या तरुणाच्या फोटोला हार घातल्यामुळे पसरली होती मेल्याची अफवा. जिंवतपणी अनूभवला मृत्यू.

Jaipur
Jawahar_subhash
जवाहर सुभाष

किकि चॅलेंज सोशल मीडियावर गाजत असताना ते चॅलेंज करताना अनेकाचे मृत्यू झाले आहेत. लोकांना हे चॅलेंज स्विकारण्यापासून थांबवण्यासाठी पोलिसांनी विविध माध्यमातून लोकांना आवाहन केलं होते. भारतातील राज्यांमध्ये पोलिसांनी सोशल मीडियावरुन लोकांना आवाहन केले. जयपूर पोलिसांनी ही फेसबुकवर फोटो टाकून लोकांना किकि चॅलेंज न करण्याचे आवाहन केले होते. मात्र यावेळी वापरण्यात आलेल्या मुलाच्या फोटोला फुलांचा हार घातला होता. तसेच फोटो खाली त्याची जन्म आणि मृत्यू वर्षाचीही नोंद पोलिसांनी केली होती. हा मुलगा मयत झाल्याची बातमी पसरली होती. मात्र हा मुलगा सध्या जिवंत असून सर्वांना सांगतो आहे की ‘मी अजून जिवंत आहे’. पोलिसांनी वापरलेल्या फोटोमुळे हा मुलगा सोशल मीडियावर फेमस झाला आहे.

काय आहे प्रकरण

फोटो खाली लिहिलेला मजकूर असा होता की,”केकेची प्रेमळ स्मृती म्हणून, किकिचा प्रियकर,चॅलेंज करताना झाला मृत्यू.(फेब्रुवारी १९९५ ते जूलै २०१८).” अशा प्रकारचे जिवघेणे चॅलेंज करू नका आणि करायला देऊ ही नका. या पोस्टमध्ये असलेल्या मुलाचे नाव जवाहर सुभाष चंद्र असून तो मूळ कोची येथे राहतो.

“मंगळवार रात्री पासून माझ्या पत्नीला व्हॉट्सअॅपवर मॅसेज येत होते. कोणालाच या बाबत कल्पना नव्हती. बुधवारी सकाळी मला ऑफिस,मित्र आणि ओळखीच्या व्यक्तींचे फोन येणे सुरु झाले. त्यांनी माझ्या प्रकृतीबाबत विचारपूस केली. त्यांना मी जिंवत असल्याचे सांगितले. सुरुवातीला मी या कडे जास्त लक्ष दिले नाही. मात्र काही वृत्तपत्रांनी मृत्यूची बातमी छापली असल्यामुळे सतत फोन येत होते. हा फोटो दहा वर्ष जूना असून तो एका जाहीरातीसाठी इंटरनेटवर टाकला होता. माझ्या मेहून्याने फोटो काढला होता. पोलिसांनी इंटरनेट वरुन कदाचित हा फोटो घेतला असावा.”- जवाहर सुभाष चंद्र

“जाहिरात एजन्सीने इंटरनेटवरुन हा फोटो घेतला होता. जर जवाहरने जाहिरातीसाठी हा फोटो टाकला असेल तर त्या साइटला एजन्सीकडून त्याचे पैसे मिळाले असणार यामध्ये काही बेकयदेशीर बाब नाही. तंबाखू जाहिरातीसाठी अनेक मॉडेल आपण रुग्णालयाच्या खाटेला खीळून असल्याचे दाखवतात. याचा अर्थ हा नाही की त्यांना खरोखचा कॅन्सर असतो. अशा जाहिराती फक्त जनजागृतीसाठी बनवल्या जातात.”- संजय अग्रवाल पोलीस आयुक्त, जयपूर

“मृत्यू नंतर किती जण आपल्या बाबत विचारपूस करतात याचा मला जिवंतपणी अनूभव आला. मी आणि माझे कुटुंबीय यासाठी खूष आहोत की माझी काळजी घेणारे बरेच आहेत, असे जवाहर म्हणाला.