घरदेश-विदेशआरोग्यक्रमवारीत केरळ प्रथम स्थानावर

आरोग्यक्रमवारीत केरळ प्रथम स्थानावर

Subscribe

आरोग्यविषयक सर्वोत्तम कामगिरीत देशात महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक

नुकताच नीती आयोगाचा दुस-या आरोग्य निर्देशांक अहवाल सादर झाला. नीती आयोगाने जाहीर केलेल्या या दुस-या आरोग्य निर्देशांक अहवालामध्ये आरोग्यविषयक सर्वोत्तम कामगिरी केल्याबद्दल केरळ देशात पहिल्या क्रमांकावर आहे. या खालोखाल दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर अनुक्रमे महाराष्ट्र आणि आंध्रप्रदेश आहे.

- Advertisement -

या सादर झालेल्या अहवालामध्ये देशातील २०१५-१६ पासून २०१७-१८ या कालावधीतील आरोग्य विषयक स्थितीच्या निर्देशांकाचा अभ्यास करण्यात आहे. आरोग्य विभागातील २३ निकषांनुसार राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेश या ठिकाणी असणाऱ्या परिस्थितीचा अभ्यास करण्यात आला आहे.

दरम्यान, आरोग्य क्षेत्राचा विकास होत असलेल्या राज्यांमध्ये झारखंड, राज्यस्थान आणि हरियाणा यांचा समावेश होत असून देशातील आरोग्य निर्देशांकाबाबत पहिल्या फेरीचा अहवाल फेब्रुवारी महिन्यात जाहीर करण्यात आला. हा अहवाल जागतिक बँकेच्या सहाय्याने केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण विभागाने तयार केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -