घरदेश-विदेशरेल्वेचे वायफाय वापरून कुलीचे स्पर्धा परिक्षेत यश

रेल्वेचे वायफाय वापरून कुलीचे स्पर्धा परिक्षेत यश

Subscribe

प्रचंड इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या बळावर आपण स्वप्न साकार करु शकतो. फक्त मनात ठाम निश्चय करणे जरुरीचे असते. मग कितीही संकटे, अडथळे आले तरी आपण यशाच्या उंच शिखरावर पोहचू शकतो. केरळच्या रेल्वे स्थानकावर काम करणाऱ्या एका कुलीने हे विचार आपल्या मेहनतीने प्रत्यक्षात उतरविले आहे. श्रीनाथ के. नावाच्या कुली काम करणाऱ्या एका युवकाने रेल्वे स्थानकावरील वायफाय वापरत स्पर्धा परिक्षेत यश मिळविले आहे.

केरळच्या एर्नाकुलम स्थानाकावर काम करणाऱ्या श्रीनाथने हे स्वप्न वास्तवात साकारले आहे. श्रीनाथ दिवसभर कुलीचे काम करायचा. काम करताना जो काही थोडाफार मोकळा वेळ मिळायचा, त्या वेळेमध्ये तो रेल्वेच्या वायफायच्या साहाय्याने मोबाईलमध्ये स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करायचा. स्पर्धा परिक्षेच्या अभ्यासक्रमाशी निगडीत व्याख्याने मोबाईलवर एकायचा.

- Advertisement -

तिसऱ्या प्रयत्नात मिळाले यश
श्रीनाथने सांगितले की, त्याने या अगोदर दोन वेळा ही परिक्षा दिली होती. दोन्ही वेळा त्याचे प्रयत्न अयशस्वी ठरले. तरीही त्याने प्रयत्न सोडले नाहीत. अखेर, तिसऱ्या प्रयत्नात तो लेखी परिक्षा उत्तीर्ण झाला.

रेल्वे वायफायचा आधार
लोकसेवा आयोगाच्या परिक्षांचे ऑनलाइन अर्ज भरण्यापासून अभ्यासक्रमासाठी लागणाऱ्या उपयुक्त माहितीची मदत रेल्वेच्या वायफायने केली असल्याचे श्रीनाथने सांगितले आहे. त्याचबरोबर परिक्षेच्या अभ्यासासाठी लागणाऱ्या पुस्तकांचा खर्च श्रीनाथच्या खिशाला परवडणारा नव्हता, असेही श्रीनाथ म्हणाला.

Chetan Patilhttps://www.mymahanagar.com/author/chetan/
writer, poet, journalist, copy writer, theater artist
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -