घरदेश-विदेशfootwear : खादीच्या चपला, बूट आता बाजारात

footwear : खादीच्या चपला, बूट आता बाजारात

Subscribe

उत्सवाच्या पार्श्वभूमीवर खादी आणि ग्रामद्योग आयोगाकडून (केव्हीआयसी) बाजारामध्ये खादीच्या चपला व बूट आणण्यात आल्या आहेत. ११०० ते ३३०० रुपयांपर्यंत उपलब्ध आहे.

खादीचे कपडे घालणे, हे प्रतिष्ठेचे मानले जाते. खादीच्या कपड्यांना राजकीय नेते, कार्यकर्ते यांच्यामध्ये चांगली क्रेझ असते. सध्या असलेल्या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर खादी आणि ग्रामद्योग आयोगाकडून (केव्हीआयसी) बाजारामध्ये खादीच्या चपला व बूट आणण्यात आल्या आहेत. ११०० ते ३३०० रुपयांपर्यंत उपलब्ध असलेल्या या खादी बूट, चप्पलांची विक्री www.khadiindia.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन करण्यात येणार आहे.

खादीची असलेली क्रेझ लक्षात घेता केव्हीआयसीने महिलांसाठी १५ तर पुरुषांसाठी १० प्रकारच्या चपला, बूट बाजारात आणल्या आहेत. गुजरातमधील पटोला सिल्क, बनारसी सिल्क, बिहारमधील मधुबनी प्रिंटेड सिल्क, खादी डेनिम, टसर सिल्क, मटका – कटिया सिल्क अशा विविध प्रकारच्या खादी, ट्वीड ऊन आणि खादी पॉली यासारख्या उत्तम खादीचा वापर करून या चपला आणि बूट बनवण्यात आल्या आहेत. उद्योगमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते खादी चपलांचे अनावरण नुकतेच करण्यात आले. खादीच्या चपला व बूट या उत्सवाबरोबरच दैनंदिन वापरता येतील अशा प्रकारे डिझाईन करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या चपला व बूट तरुणांना आकर्षित करतील, असा विश्वास यावेळी नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. लोकल टू ग्लोबल या पंतप्रधानांच्या विचारानुसारच खादीच्या चपला बाजारामध्ये आणण्यात आल्या आहेत. यापूर्वी टायटनसोबत केव्हीआयसीने खादीचे खड्याळ बाजारात आणले होते.

- Advertisement -

आंतरराष्ट्रीय स्तरावरमध्ये खादी चप्पल व बूट मोठे मार्केट काबीज करतील. जेणेकरून खादीच्या चपलांमुळे अर्थव्यवस्था पुनर्जीवित करण्यासाठी मदत होईल. खादीपासून बनवलेल्या चपला हा एक छोटा प्रयत्न असला तरी खादी कारागिरांसाठी ही एक मोठी झेप ठरणार आहे. यामुळे खादी कारीगरांना अतिरिक्त रोजगार मिळण्यास मदत होणार आहे. भारतीय फुटवियर उद्योग जवळपास ५० हजार कोटींचा आहे यामध्ये साधारण १८ हजार कोटींची निर्यात करण्यात येतात. सुरुवातीच्या काळामध्ये या उद्योगातील दोन टक्के बाजारावर आमचे लक्ष असून, ते जवळपास एक हजार कोटीपर्यंत नेणार असल्याचे खादी और ग्रामोद्योग आयोग के अध्यक्ष विनय कुमार सक्सेना यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -