घरदेश-विदेशखशोगी हत्यांकाड- डोनाल्ड ट्रम्प यांचा यू टर्न

खशोगी हत्यांकाड- डोनाल्ड ट्रम्प यांचा यू टर्न

Subscribe

सेंट्रल इंटेलिजेंस एजन्सी (सीआयए) द्वारे केलेल्या तपासामध्ये सौदी अरेबियानेच खशोगी यांची हत्या केल्याचे निष्कर्ष काढण्यात आला नसल्याचे वक्तव्य अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे.

पत्रकार जमाल खगोशी यांच्या हत्येप्रकरणी सौदी अरेबियाला जवाबदार ठरवणारा अमेरिका एकाऐकी आपल्या विधानांपासून पलटले आहे. सौदी अरेबियाचे क्राऊन प्रिंस बीन सलमान यांच्या विरोधात बोलल्यामुळे या पत्रकाराची हत्या करण्यात आली असल्याचा दावा अमेरिका करत होती. तसेच त्यांच्या मृत्यूनंतर अमेरिका सौदी अरेबियाला आंतरराष्ट्रीय न्यायालयात खेचणार असल्याचे सांगितल्या जात होते. मात्र एकाऐकी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे सुर बदलले आहे. सेंट्रल इंटेलिजेंस एजन्सी (सीआयए) द्वारे केलेल्या तपासामध्ये सौदी अरेबियानेच खशोगी यांची हत्या केल्याचे निष्कर्ष काढण्यात आला नाही. असे म्हणत त्यांनी सौदी अरेबिवर केलेला आरोपांपासून यूटर्न घेतला आहे. २ ऑक्टोबर पासून सौदी अरेबियाचे पत्रकार जमाल खगोशी हे बेपत्ता होते. त्यांची अमानुशपणे हत्या करण्यात आली होती.

- Advertisement -

काय आहे प्रकरण

पत्रकार जमाल खदोशी हे एक सौदी अरेबियातील पत्रकार होते. सौदी अरेबियामध्ये पत्रकारांवर स्वातंत्र्य नसल्यामुळे त्यांनी विरोधात आवाज उचलला होता. सौदी अरेबिया विरोधात त्यांनी अनेक लेख लिहिले होते. त्यामुळे सौदी सरकार त्यांच्यापासून नाराज होती. काही महिन्यांपूर्वी खदोशी हे अमेरिकेत स्थायिक झाले होते. खागोशी हे लवकरच विवाहबंधनात अडकणार होते. यासाठी ते टर्कीतील इस्तानबुल शहरात आले होते. लग्न करण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची जमवा जमव करण्यासाठी २ ऑक्टोबर रोजी ते सौदी अरेबियाच्या दूतावासात गेले होते. त्यानंतर ते अनेक दिवस बेपत्ता होते. यानंतर कोणालाच ते दिसले नाही म्हणून टर्कीच्या सुरक्षा यंत्रणांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -