तरुणाला टिकटॉक व्हिडिओ दाखवून केलं किडनॅप आणि बनवलं किन्नर!

kidnapped the young man from bhogaon brought him to jaipur and make him transgender at Rajasthan
तरुणाला टिकटॉक व्हिडिओ दाखवून केलं किडनॅप आणि बनवलं किन्नर!

राजस्थानमधील जयपूर येथील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जयपुरमधील भोगांव संबंधित एक प्रकरण उघडकीस आले आहे. वास्तविक काही किन्नरांनी भोगांवच्या एक तरुणाचे अपहरण करून जयपुरला आणून त्याला किन्नर बनल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

माहितीनुसार, मोबाईलवर टिकटॉक डान्स व्हिडिओ दाखवून किन्नरांनी त्या तरुणाला आपल्यासोबत घेऊन गेले आणि त्याला नशेच इंजेक्शन लावून त्याला किन्नर बनवलं. याप्रकरणी पोलिसांनी एका तरुणाला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून चौकशी केली जात आहे.

मंगळवारी भीमनगर रहिवाशी शिवमंगल सिंह यांने पोलिसात आपल्या १६ वर्षीय मुलगा सनीबाबत तक्रार दाखल केली आणि म्हणाला की, ६ ऑक्टोबरच्या रात्री १० वाजता सनी घरातून बाजारात जातो म्हणून सांगून गेला होता. परंतु तो रात्री घरी परतलाच नाही.

सोमवारी सायंकाळी ५च्या सुमारास तो अचानक घरी आला. त्याची चौकशी करत असताना त्याने सांगितले की, ‘भोगांव चौकात त्याला काही किन्नर भेटले. त्याला जबरदस्ती एका गाडीत घुसवले. एवढंच नाही तर त्या तरुणाला इंजेक्शन देऊन त्याला बेशुद्ध केलं. जेव्हा तो शुद्धीत आला तेव्हा तो जयपूरमध्ये होता. त्याला तेथे एका घरात ठेवून बेशुद्ध करण्याचे इंजेक्शन देऊन त्याला किन्नर बनवायची औषधे चार दिवस त्याला दिली गेली.’

याप्रकरणी बोलताना पोलीस स्टेशन प्रभारी पहुप सिंह म्हणाले की, ‘याप्रकरणी शोध घेण्यात येत आहे आणि तपासात समोर आले आहे की, तरुणा आपल्या इच्छेनुसार किन्नरांसोबत जयपुराला गेला होता.’ पोलिसांना तरुणांची मेडिकल चाचणी आणि दोषी किन्नरांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे सांगितले आहे.


हेही वाचा – लॉकडाऊनमध्ये केलं लग्न, अनलॉक होताच बायको नवऱ्याला सोडून फरार!