घरदेश-विदेशकिकि चॅलेंज न करण्याचे पोलिसांनी केले आवाहान

किकि चॅलेंज न करण्याचे पोलिसांनी केले आवाहान

Subscribe

किकिचॅलेंज न स्विकारण्याचे आवाहान पोलिसांकडून केले जात आहे. या चॅलेंजमुळे मोठ्या प्रमाणात अपघात होत आहे. त्यामुळे मुंबई, उत्तर प्रदेश, दिल्ली आणि जयपुर पोलिसांनी असे चॅलेंज न स्विकारण्याचे आवाहान केले आहे.

सध्या किकि चॅलेंज सोशल मीडियावर चांगलेच गाजत आहे. विदेशामध्ये या ट्रेंडने धूमाकूळ घातल्यानंतर आता याचे वारे देशातही वाहू लागले आहे. दरम्यान, मुंबई पोलिसांनी हे चॅलेंज न स्विकारण्याचे तरुणांना आवाहन केले आहे. मुंबई पोलिसांबरोबरच उत्तरप्रदेश, दिल्ली आणि जयपूर पोलिसांनी ट्विटरद्वारे अशाप्रकारचे चॅलेंज न स्विकारण्याचे आवाहान केले आहे.

या चॅलेंजमुळे होत आहेत अपघात

कॅनडाचे प्रसिद्ध गायक ड्रेक यांनी गायलेले इन ‘माय फिलिंग्स’ या गाण्यावर ऑनलाईन कॉमेडी शिग्गीने केलेल्या नृत्यानंतर सुरु झालेल्या ट्रेंडमुळे मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. या चॅलेंजमध्ये व्हिडिओ बनवण्याच्या खटाटोपात बऱ्याच  तरुण-तरुणींचे अपघात होतात. यामुळे कित्येक तरुण-तरुणी व्हिडिओ बनवताना गंभीर जखमी झालेत. काही इन्स्टाग्राम व्हिडिओंमध्ये चालत्या गाडीमधून रस्त्यावर उतरुन नृत्य करताना बाजूने जाणाऱ्या गाडीने दिलेल्या धडकेत तरुणीचा मृत्यू झाला. अशा जीवघेण्या ट्रेंडला रोखण्यासाठी अबू धाबी आणि अमेरिकेतील काही राज्यांमध्ये सरकारकडून या ट्रेंडवर पूर्णपणे बंदी आणली आहे. इतर देशाप्रमानेच भारतातही अशा जीवघेण्याखेळामुळे लोकांचा जीव धोक्यात न जाण्यासाठी पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे.

- Advertisement -

मुंबई पोलिसांचे ट्विट

मुंबई पोलिसांनी यासंबंधी एक व्हिडिओ ट्विट केला आहे, या व्हिडिओत असे स्टंट न करण्याचे आवाहन केले आहे. ‘यामुळे फक्त तुमचाच जीव धोक्यात येत नसून इतरांचाही जीव धोक्यात येऊ शकतो’,असे सांगितले आहे.

- Advertisement -

उत्तर प्रदेश पोलिसांचे ट्विट

मुंबई पोलिसांच्या ट्विटनंतर उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी देखील याविषयी असाच संदेश देणार ट्विट केले. यामध्ये पोलिसांनी पालकांना उद्देशून आपल्या मुलांना या चॅलेंजपासून रोखण्याचे आवाहान केले आहे.

दिल्ली पोलिसांनी केले ट्विट

उत्तर प्रदेश पोलिसानंतर दिल्ली पोलिसांनीही यासंबंधी ट्विट केले आहे. यामध्ये दिल्ली पोलिसांनी रस्त्यावर नृत्य न करण्याचे सांगितले आहे.

जयपूर पोलिसांनी केले ट्विट

आता जयपूर पोलिसांनीही याविषयी फेसबूकवर पोस्ट केले आहे. जयपूरमध्ये या चॅलेंजमुळे एकाचा मृत्यू झाला. या तरुणाला श्रद्धांजली वाहत पोलिसांनी फेसबूकवर असे चॅलेंज न स्विकारण्याचे आवाहन केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -