घरदेश-विदेशमुंबईतील टिनी मिरॅकल्सला राजे विलेम-अलेक्झांडर, राणी मेक्सिमांची भेट

मुंबईतील टिनी मिरॅकल्सला राजे विलेम-अलेक्झांडर, राणी मेक्सिमांची भेट

Subscribe

भारत आणि नेदरलँड्समधील जुने संबंध घनिष्ठ करणे हा या भारत भेटीमागील उद्देश

नेदरलँड्सचे राजे विलेम-अलेक्झांडर आणि राणी मेक्सिमा यांच्या भारत भेटींतर्गत मुंबईतील पहिल्या कार्यक्रमात शाही दांपत्याने आज ‘टिनी मिरॅकल्स’ला भेट दिली. ‘टिनी मिरॅकल्स’ ही संस्था डच उद्योजक लॉरेन मेटर यांनी स्थापन केलेली आहे. डच विदेश व्यापार आणि विकास सहकार मंत्री सिग्रीड काग यांच्यासोबत शाही दांपत्य टिनी मिरॅकल्स, मुंबई येथे पोहोचले असता टिनी मिरॅकल्सचे संस्थापक लॉरेन मेटर आणि संचालिका ग्रेस जोसेफ यांनी त्यांचे स्वागत केले.

“जगातील दारिद्र्याचा प्रश्न कसा सोडवता येऊ शकतो यावर मॅजेस्टी किंग विलेम-अलेक्झांडर व क्वीन मेक्सिमा यांच्याशी चर्चा करण्याची व मते मांडण्याची मिळालेली संधी हा आमच्यासाठी एक बहुमानच आहे.”, –  टिनी मिरॅकल्सचे संस्थापक लॉरेन मेटर

राजे विलेम-अलेक्झांडर आणि राणी मेक्सिमांची भेट प्रथम परदेशी महिलानिर्मित उत्पादनांचे विशेष प्रदर्शन पाहिले. त्यानंतर प्रत्यक्षात उत्पादने तयार केली जातात, ते शिक्षण-प्रशिक्षण केंद्र पाहण्यासाठी गेले. त्यांनतर शाही दांपत्याने इथे काही महिलांशी चर्चा केली आणि काही डच डिझाइन उत्पादने स्वतः बनवण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर, त्यांनी जवळपासच्या शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांशी संवाद साधला, जेथे टिनी मिरॅकल्ससाठी काम करणाऱ्या महिलांची मुले शाळेत जातात. टिनी मिरॅकल्सच्या महिला कामगारांसोबत एक फोटो काढून या भेटीची सांगता झाली.

- Advertisement -

असा आहे भारत भेटीमागील उद्देश 

राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या निमंत्रणाला मान देत महामहिम राजे विलेम-अलेक्झांडर आणि क्वीन मेक्सिमा भारत भेटीसाठी आले आहेत. दिनांक १४ ते १८ ऑक्टोबर दरम्यान ते भारत भेटीवर आहेत या दरम्यान, नवी दिल्ली, मुंबई आणि केरळ राज्यांचा समावेश आहे. भारत आणि नेदरलँड्समधील जुने संबंध घनिष्ठ करणे हा या भारत भेटीमागील उद्देश आहे. या भेटीमध्ये जल तंत्रज्ञान, सागरी विकास, आरोग्य सेवा, शाश्वत शेती, सामाजिक उपक्रम आणि सांस्कृतिक वारसा यासारख्या प्रमुख बाबींवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे.

हे देखील या भेट दौऱ्यात सहभागी

परराष्ट्र व्यवहार मंत्री स्टेफ ब्लोक आणि परराष्ट्र व्यापार तसेच विकास सहकार मंत्री सिग्रीड काग हे कार्यक्रमाच्या स्वरूपानुसार शाही दांपत्याच्या सोबत असतील. या भारत भेट दौऱ्यामध्ये एक समांतर आणि व्यापक व्यापार अभियानदेखील समाविष्ट आहे, ज्यात दोन्ही देशांमधील भविष्यकालीन आर्थिक भागीदारीच्या संभाव्य शक्यतांचा शोध घेण्यात येईल. तसेच आरोग्यसेवा मंत्री ब्रुनो ब्रुइन्स व आर्थिक व्यवहार आणि हवामान धोरण राज्य सचिव मोना केइझर हे देखील या भेट दौऱ्यात असणार आहेत.

- Advertisement -

शाही दांपत्य राजा विलेम-अलेक्झांडर आणि राणी मेक्सिमा यांचे रविवारी (१३ ऑक्टोबर) रोजी दिल्लीत आगमन झाले. शाही दांपत्याने सोमवारी राष्ट्रपती राम नाथ कोविंद आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी त्यांचे स्वागत केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -