घरदेश-विदेशहे काय झालं? निकालाआधीच किरण खेर 'पडल्या'!

हे काय झालं? निकालाआधीच किरण खेर ‘पडल्या’!

Subscribe

किरण खेर यांनी मतदानानंतर ट्वीट केले आहे. 'माझं मत राष्ट्राच्या विकासासाठी आहे. तुम्ही पण मतदान नक्की करा. तुमचं मत मौल्यवान आहे. ते वाया घालवू नका.'

आज निवडणूकीच्या सातव्या आणि अंतीम टप्प्याचे मतदान सुरू आहे. पंतप्रधान मोदी यांच्यासह अन्य २५ उमेदवार रिंगणात आहेत. चंदीगढ मधून खासदार किरण खेर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आज मतदानासाठी आपले पती अनुपम खेर यांच्यासोबत त्या मतदान केंद्रावर पोहचल्या. पण मतदान करण्या आधीच किरण खेर पडल्या असं ऐकू यायला लागलं.

- Advertisement -

त्याच झालं असं, मतदानाला जाताना किरण खेर पत्रकारांशी बोलत होत्या. त्या बोलत असताना त्यांचा पाय कॅमेराच्या वायरमध्ये अडकला आणि त्या पडल्या. किरण खेर या चंडिगडमधून भाजपकडून दुसऱ्यांदा उमेदवारी लढवत आहेत. तर काँग्रेसकडून माजी केंद्रीय मंत्री पवन कुमार यांना चौथ्यांदा उमेदवारी देण्यात आली आहे. तर आम आदमी पक्षाने हरमोहन धवन यांना तिकीट दिले आहे. २०१४ मध्ये धवन यांनी किरण खेर यांना समर्थन दिले होते.

- Advertisement -

किरण खेर यांनी मतदानानंतर ट्वीट केले आहे. ‘माझं मत राष्ट्राच्या विकासासाठी आहे. तुम्ही पण मतदान नक्की करा. तुमचं मत मौल्यवान आहे. ते वाया घालवू नका.’

लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या म्हणजे सातव्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघासह ५९ मतदारसंघांत उत्तर प्रदेश, पंजाब, पश्चिम बंगाल, बिहार, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, झारखंड या राज्यांसह चंडीगड येथे अखेरच्या टप्प्यातील मतदान होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -