कोरोनावर गोमूत्र प्या, असा सल्ला देणारे भाजपाचे नेते कोरोना पॉझिटिव्ह

kolkata bengal bjp president dilip ghosh corona positive
कोरोनावर गोमूत्र प्या, असा सल्ला देणारे भाजपाचे नेते कोरोना पॉझिटिव्ह

पश्चिम बंगालचे भाजपचे अध्यक्ष दिलीप घोष अजब वक्तव्य करून चर्चेत येत असतात. त्यांनी काही महिन्यांवर कोरोनपासून बचाव करण्यासाठी गोमूत्र प्या, असा सल्ला दिला होता. पण आता दिलीप घोष यांनाच कोरोनाची लागण झाल्याचे समोर येत आहे. त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आलं आहे. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, दिलीप घोष यांना थोडा ताप होता, ज्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांनी सांगितले की, ‘घोष यांना १०२ डिग्री ताप होता. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची ऑक्सीजनची लेव्हल सामान्य आहे, चिंता करण्याची काही गरज नाही.’

गेल्या दोन दिवसांपासून घोष यांची प्रकृती खराब होती. ज्यानंतर त्यांची कोरोनाची चाचणी करण्यात आली. शुक्रवारी त्यांच्या रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. काही महिन्यांवर पूर्वी दिलीप घोष कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी गोमूत्र प्या असा सल्ला दिला. गोमूत्र प्यायल्याने शरीरात कोरोना विषाणूशी लढण्यासाठी रोग प्रतिकारशक्ती वाढते, असं दिलीप घोष म्हणाले होते. त्यामुळे त्यादरम्यान घोष यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता.

यापूर्वी दिपील घोष यांनी देशी गायींच्या दुधामध्ये सोनं असतं, असा दावा केला होता. यामुळे देखील ते सोशल मीडियावर ट्रोल झाले होते. ‘देशी गायीचे एक वैशिष्ट म्हणजे त्याच्या दुधात सोनं असतं. म्हणून गायीचे दुध पिवळसर दिसतं’, असं घोष म्हणाले होते.


हेही वाचा – Video: ‘भाभीजी पापड खा आणि कोरोनावर मात करा’, भाजपच्या खासदाराचा अजब दावा!