घरट्रेंडिंगK-Drama Star 'साँग यू जंग' हिचा २६व्या वर्षी मृत्यू

K-Drama Star ‘साँग यू जंग’ हिचा २६व्या वर्षी मृत्यू

Subscribe

मिळालेल्या माहितीनुसार, २५ जानेवारी रोजी साँग यू जंगचे निधन झाले. मात्र तिच्या मृत्यूचे कारण अद्याप समोर आलेले नाही. २०१३ सालच्या 'सीटकॉम गोल्डन रेनबो' मधून तिने तिच्या अभिनयाच्या करिअरला सुरुवात केली. या शोमुळे साँग रातो रात स्टॉर झाली होती.

कोरियन अभिनेत्री ‘साँग यू जंग’ हिचे वयाच्या केवळ २६व्या वर्षी अकाली निधन झाले. तिच्या निधनामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २५ जानेवारी रोजी साँग यू जंगचे निधन झाले. मात्र तिच्या मृत्यूचे कारण अद्याप समोर आलेले नाही. २०१३ सालच्या ‘सीटकॉम गोल्डन रेनबो’ मधून तिने तिच्या अभिनयाच्या करिअरला सुरुवात केली. या शोमुळे साँग रातो रात स्टॉर झाली होती. किम यू जंग आणि जंग इल वू यांच्या सोबत साँग यो जंग या किशोर वयीन अभिनेत्री भूमिका साकारली होती. या नाटकात तिने अत्यंत भावनिक रोल साकारला होता. तिच्या या भूमिकेमुळे तिला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. त्यानंतर ती २०१४ साली आलेल्या ‘मेक अ विश’ या सिरिजमध्ये साँग मुख्य भूमिकेत दिसली होती.

फार कमी वयात आणि साँग यू जंग हिने महत्त्वाची कारकिर्द बजावली होती. अनेक नाटकातून आणि व्हिडिओमधून तिने प्रेक्षकांचे मन जिंकले होती. २०१८मध्ये साँगने ‘बॉय बँडच्या इकोन’च्या एका म्युझिकल व्हिडिओ मधून समोर आली होती. तिचे हे सॅड साँग आणि त्यातील लिरिक्सने उपस्थित असलेल्या सर्व प्रेक्षकांची मने जिंकली होती. साँग यू जंगने वेब सिरिजमध्येही काम केले होते. ‘डिअर माय नेम’ ही तिची सर्वात लोकप्रिय झालेली वेब सिरिज आहे. २०१९मध्ये साँगची ही वेब सिरिज रिलीज झाली होती. या वेब सिरिजमध्ये तिने हायस्कूलमध्ये शिकत असलेल्या एका विद्यार्थीनीची भूमिका साकारली होती, जी तिच्या साथीदाराचा शोध घेत असते. २०२०मध्ये रिलिज झालेल्या एका म्युझिकल व्हिडिओमुळे साँगला खूप प्रसिद्धी मिळाली होती.

- Advertisement -

साँग यू जंग ही फार कमी कालवधीत प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. अभिनय, गाणे त्याचबरोबर ती टिव्ही कमर्शिअल शो देखिल करत होती. साँग सोशल मीडियावरही खूप सक्रिय होती. तिच्या सोशल मीडियावर नेहमी फोटो शेअर करत. तिच्या बऱ्याच फोटोंमधून ती अनेक उत्पादनाच्या जाहिराती करतानाही दिसली होती. तिच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. तिला श्रद्धांजली वाहताना तिच्या चाहत्यांनी अनेक भावूक पोस्ट लिहिल्या आहेत. ग्लोबल न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून दक्षिण कोरियामध्ये कलाकारांचा फार कमी वयात मृत्यू होत आहे. त्याचबरोबर दक्षिण कोरियामध्ये आत्महत्या करण्याचे प्रमाणही वाढले आहे.


हेही वाचा – GoodNews! नव्या वर्षात जॉबचं No Tension; ‘या’ कंपन्यांमध्ये होणार मेगा भरती

- Advertisement -

 

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -