घरदेश-विदेशबॉम्बवर्षावाचे पुरावे मागणाऱ्यांना १०० ग्रॅम बॉम्ब द्या - कुमार विश्वास

बॉम्बवर्षावाचे पुरावे मागणाऱ्यांना १०० ग्रॅम बॉम्ब द्या – कुमार विश्वास

Subscribe

पुलवामा दहशतवादी हल्ल्याचे भारतीय हवाई दलाने चोखप्रत्युत्तर दिले आहे. मात्र या कारवाईचे मागितल्यास पुरावे मागणाऱ्यांना १०० ग्राम बॉम्ब द्या असे ट्विटकरत प्रसिद्ध कवी कुमार विश्वास यांनी थेट उल्लेख न करता केजरीवालाना टोला लगावला आहे.

भारतीय वायुसेनेने मंगळवारी दहशतवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्याचे भारतीय हवाई दलाने चोखप्रत्युत्तर दिले आहे. आज भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक केले. मात्र भारतीय हवाईदलाने केलेल्या बॉम्बवर्षावाचे कोणी पुरावे मागितले तर त्यांना १०० ग्रामचा बॉम्ब द्या, असा सणसणीत टोला प्रसिद्ध कवी आणि आम आदमी पक्षाचे माजी नेते कुमार विश्वास यांनी दिल्लीचे मुंख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना लगावला आहे. केजरावाल यांनी ‘उरी’च्या हल्ल्यानंतर करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राइकचे पुरावे मागितले होते. त्या अनुषंगानं विश्वास यांनी हे ट्विट केलं आहे.

- Advertisement -

‘उरी’च सर्जिकल स्ट्राइक

२०१६ मध्ये उरीवर पाक पुरस्कृत दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर भारतीय सैन्याने दहशतवाद्यांच्या तळावर सर्जिकल स्ट्राइक केले होते. मात्र भारतातील काही राजकीय नेत्यांनी या स्ट्राइकवर प्रश्मचिन्ह उपस्थित केलं होतं. या दरम्यान, केजरीवाल यांनी जाहीर पत्रकार परिषद घेऊन या हल्ल्याचे पुरावे देण्याची मागणी देखील करण्यात आली होती. मात्र त्याचा थेट उल्लेख न करता विश्वास यांनी केजरीवालाना टोला हाणला आहे.

इम्रान खान यांनाही टोला

विश्वास यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनाही सुनावले आहे. तसेच ‘शांतीचा पांढरा रंग आवडत नाही, पण ‘हा’ लाल रंग त्यांना निश्चित आवडेल,’ असे देखील विश्वास म्हणले आहेत.

- Advertisement -

कुमार विश्वास यांच्याविषयी

प्रसिद्ध कवी कुमार विश्वास हे काही दिवसांपूर्वीपर्यंत आम आदमी पक्षाचे नेते होते. ‘आप’च्या तिकिटावर अमेठीमध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींविरोधात कुमार विश्वास यांनी २०१४ च्या लोकसभेची निवडणूकही लढवली होती.


हेही वाचा – तुम्ही झोपा काढत होता का?; पाकिस्तानी जनतेचा वायूसेनेला सवाल

हेही वाचा – हवाई हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने ट्विट केली ‘ही’ ट्विट


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -