घरदेश-विदेशविसाव्या वर्षी 'ती' बनली... अब्जावधींची मालकीण

विसाव्या वर्षी ‘ती’ बनली… अब्जावधींची मालकीण

Subscribe

कमी वयात अब्जाधीश होणाऱ्यामंध्ये मार्क झ्युकरबर्गच पहिल्या नंबरवर होता. मात्र, आता केली जेनरने हे स्थान पटकवलं आहेत. जप्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेत्री- किम कर्दाशिअनची ती सावत्र बहिण आहे. 

कोणाचं भाग्य कधी उजळेल याचा काही नेम नाही! मॉडेल- अभिनेत्री केली जेनर हिच्या बाबतीतही काहीसं असंच झालंय. केली जेनर अवघ्या २० व्या वर्षी अब्जावधी रुपयांची मालकीण बनली आहे. इतक्या कमी वयात अब्जाधीश बनल्यामुळे केली सध्या जगभरात चर्चेचा विषय ठरते आहे. फेसबुकचा सर्वेसर्वा असलेल्या मार्क झ्युकरबगला कहीच दिवसांपूर्वी जगातील तिसरा श्रीमंत व्यक्ती घोषित करण्यात आलं होतं. मात्र, आश्चर्याची बाब म्हणजे केली जेनरने अब्जाधिश बनत चक्क मार्कलाही मागे टाकलं आहे. आतापर्यंत कमी वयात अब्जाधीश होणाऱ्यामंध्ये मार्क झ्युकरबर्गच पहिल्या नंबरवर होता. मात्र, आता केलीने हे स्थान पटकवलं आहेत. जप्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेत्री- किम कर्दाशिअनची केली ही सावत्र बहिण आहे.

सौंदर्य प्रसाधन कंपनीची मालकीण 

अब्जाधीश बनलेली केली जेनर एक यशस्वी मॉडेल आणि व्यावसायिका आहे. ‘केली कॉस्मेटिक्स’ नावाच तिचा स्वत:चा जगप्रसिद्ध ब्रँड आहे. केली कॉस्मेटिक्स या कंपनीमध्ये बनवली जाणारी सौंदर्य प्रसाधनं जगाच्या कानाकोपऱ्यात लोकप्रिय आहेत. या ब्रँडची खासियत आहे ओठांना आकर्षित बनवणारी सौंदर्यप्रसाधनं. केली स्वत: तिच्या आकर्षक ओठांसाठी प्रसिद्ध आहे. तिच्या ओठांमुळे ती आजवर अनेकदा हेडलाईन आहे. दरम्यान फोर्ब्स मासिकाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, केलीची सध्याची संपत्ती ६१ अब्ज ७४ कोटी रुपये इतकी आहे. तसंच तिच्या केली कॉस्मेटिक्स या कंपनीची मार्केट व्हॅल्यू- ५४ अब्जांच्या घरात आहे.

- Advertisement -
kylie jenner lips
केली जेनर (सौजन्य- इन्स्टाग्राम)

कंपनीने बनवले मालामाल

किम कर्दाशिअनची बहिण असल्यामुळे केली सुरुवातीपासूनच वर्ल्ड फेमस होती. मात्र, तिला आणखी प्रसिद्धी आणि पैसा मिळवून दिला तो तिच्या सौंदर्य प्रसाधन बनवणाऱ्या कंपनीने. केली कॉस्मेटिकच्या उत्पादनांना आज जगभरातून मागणी आहे. अनेक नावाजलेल्या मॉडेल्स तसंच अभिनेत्री केली कॉस्मेटिक्सचा वापर करतात. केलीचा जन्म तोंडात सोन्याचा चमचा घेऊन झाला असला, तरी तिने स्वत:च्या मेहतीने ही कंपनी उभी केल्याचं बोललं जातं. नुकतीच फोर्ब्सने अमेरिकेमधील  ‘self-made US billionaire’ची यादी जाहीर केली असून, केली जेनर यामध्ये १९ व्या स्थानावर आहे.

kylie jenner products
‘केली कॉस्नेटिक’ कंपनीचे प्रॉडक्ट्स
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -