‘पुरुषांपेक्षा महिला जास्त स्मार्ट’; राहुल गांधी यांचं मत

महिला या पुरुषांपेक्षा जास्त स्मार्ट असतात, अशी प्रांजळ कबूली काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिली आहे. बुधवारी राहुल गांधी तामिळनाडूमधील चेन्नईत विद्यार्थ्यांशी संवाद साधत असताना त्यांने हे मत व्यक्त केले.

Mumbai
Congress President Rahul Gandhi
काँग्रेस पक्षाध्यक्ष राहुल गांधी

महिला या पुरुषांपेक्षा जास्त स्मार्ट असतात, अशी प्रांजळ कबूली काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिली आहे. आज, बुधवारी राहुल गांधी तामिळनाडूमधील चेन्नईत विद्यार्थ्यांशी संवाद साधत असताना त्यांने हे मत व्यक्त केले. चेन्नईच्या स्टेला मेरिस कॉलेज फॉर वुमनमधील विद्यार्थ्यांशी राहुल गांधी यांनी हा संवाद साधला. सध्या भारतात विचारधारेची लढाई सुरू आहे. इथे दोन विचारधारांमध्ये युद्ध सुरू आहे. एक विचारधारा देशाला एकत्र करण्याच्या बाजूने आहे. सर्व देशवासी एकत्र यावेत, सुख, शांती नांदावी यासाठी ही विचारधारा प्रयत्नात आहे. तर दुसरी विचारधारा जी विद्यमान सरकार आणि पंतप्रधानांची आहे. एकाच विचारावर देश चालावा असे त्यांना वाटते. त्यांच्याकडे महिलांच्या समाजातील भूमिकेवर स्वत:चे विचार आहेत. भाषांवर त्यांचे विचार आहेत. संस्कृतीवर विचार आहेत पण इतर विचारांची त्यांच्याकडे कमतरता आहे, असेही राहुल यावेळी म्हणाले. तर सध्या सर्वाधिक चर्चेत असलेल्या राफेल विमान घोटाळा प्रकरणावरूनही त्यांनी सरकारला लक्ष केले.

काय म्हणाले राहुल गांधी 

रॉबर्ट वढेरा यांच्यावर तुम्हाला कारवाई करायची आहे. तुमच्याकडे सर्व साधनेही आहेत. पण कधी पंतप्रधान स्वत: राफेलवर एकतरी शब्द बोलले आहेत का? रॉबर्ट वढेरा तपासात सहकार्य करत आहेत. पण संपूर्ण देश जाणतो की पंतप्रधान मोदींनी राफेल करारात काय केले आहे. तरीही त्यांनी मौन बाळगले आहे. राफेल आणि देसॉल्टच्या कागदपत्रांमध्ये थेट पंतप्रधानांचे नाव आले आहे. त्यांची चौकशी झालीच पाहिजे. मोदी असोत की वढेरा भ्रष्टाचारप्रकरणी चौकशी झालीच पाहिजे, अशी आग्रही मागणी राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांसमोर केली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here